Nashik News: मोफत अंत्यसंस्कार योजनेतून श्रीमंत वगळणार!

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : महापालिकेकडून सर्वधर्मियांसाठी सुरू असलेली मोफत अंत्यसंस्कार योजना गरीब वर्गासाठी सुरू ठेवून यातून श्रीमंत वर्गाला वगळण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. महासभेवर त्या संदर्भात प्रस्ताव सादर करून अंतिम मान्यता घेतली जाणार आहे. (rich will excluded from free funeral scheme Nashik News)

महापालिकेमध्ये २००२ मध्ये प्रथमच भाजप व शिवसेना युतीची सत्ता आली होती. नाशिक हे धार्मिक क्षेत्र असल्याने येथे अंत्यविधी व त्यानंतरच्या धार्मिक कार्यासाठीदेखील भाविक मोठ्या प्रमाणात येतात ही बाब लक्षात घेऊन मोफत अंत्यसंस्कार योजना २००३ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तेव्हापासून आतापर्यंत निरंतर ही सेवा सुरू आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली जाते.

हिंदू मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका मृतदेहामागे आठ मन लाकूड, पाच लिटर रॉकेल, एक मडके व गवऱ्या दिल्या जातात. दफन विधीसाठी देखील त्या- त्या धर्म, पंथानुसार मोफत साहित्य पुरविले जाते.

यासाठी महापालिकेकडून दरवर्षी निविदा काढून कंत्राट दिले जाते. मोफत अंत्यसंस्कार योजना लोकप्रिय झाल्याने राज्यातील इतर महापालिकांनीदेखील सुरू करण्यासाठी त्या-त्या भागातून मागणी होते.

एखाद्या कुटुंबात व्यक्ती निधन पावल्यास फक्त मृतदेह घरातून नेण्यापासून ते अंत्यविधी होईपर्यंत मोफत सेवा पुरविली जाते.

NMC Nashik News
Corona Update News : नाशिक, मालेगावात आता कोरोनाचे शून्‍य सक्रिय रुग्‍ण

योजना लोकाभिमुख असली तरी महापालिकेला आता परवडणारी नाही. पुढील पाच ते सहा वर्षात योजनेचा खर्च दहा कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे या योजनेचा पुनर्विचार करण्याच्या अनुषंगाने योजनेतील लाभार्थी सरसकट न ठेवता सदरची योजना फक्त दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाच लागू राहील.

यासाठी प्रस्ताव सादर करण्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरीकांना मोफत उपचार देतात, त्याच धर्तीवर ही योजना यापुढे अमलात आणण्याचे नियोजन करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

विद्युत दाहिनी मोफत

आरोग्य विभागाकडून राज्यातील पुणे व ठाणे महापालिकांकडून अंत्यविधी संदर्भातील नियमावली मागविली आहे. इतर महापालिकांमध्ये विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केल्यास त्यावर कुठलेही दर आकारले जात नाही.

त्याच धर्तीवर नाशिकमध्येदेखील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाल्यास दर आकारले जाणार नाही. मात्र, लाकडावर अंत्यविधी करायचे झाल्यास दारिद्र्य रेषेखालील लोकांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना लाकडाचे दर आकारण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

NMC Nashik News
Nashik Air Pollution : नाशिकच्या आल्हाददायक हवेला प्रदूषणाचे ग्रहण; 11 घटक कारणीभूत

दानशूरांकडून प्रतिसाद नाही

मोफत अंत्यसंस्कार योजना अमलात आणताना १८ स्मशानभूमीत दानपेटी ठेवण्यात आली होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृतांचे कुटुंबीय किंवा नातेवाईकांकडून पेटीत दान टाकून त्यातून हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणूनमोफत योजनेचा खर्च भागविला जाईल, अशी संकल्पना होती. मात्र दानशूरांकडून दानपेटीत फारच कमी दान टाकल्याचे मागील वीस वर्षाच्या हिशोबातून दिसून आले.

पेटीतून दानाची चोरी

नाशिक अमरधाममध्ये मोठी दानपेटी ठेवण्यात आली आहे. मात्र, या भागातील नशेबाजांकडून पेटीतील कागदाचे दान च्युइंगमच्या साह्याने चोरले जात असल्याचे निदर्शनास आले. तारेला च्युइंगम गम लावून त्या माध्यमातून कागदी नोटा चोरल्या गेल्याने दानपेटीतील दानाची लुट झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे.

NMC Nashik News
Nashik Crime News: Instagramवर रिल्स बनवून चमकोगिरी पडली महागात! घातक हत्यारांसह दोघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com