
The indigenous Tejas fighter jet unveiled at HAL Ozar, showcasing India’s strides in defense self-reliance.
Sakal
नाशिक: ‘‘संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक लढाऊ तेजस विमानामुळे हवाई दलाला नवीन बळ लाभले आहे. ‘तेजस’ची निर्मिती करणारे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. या निर्मितीच्या माध्यमातून भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे,’’ असे कौतुकोद्गार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काढले.