भारताचे वीर जवान किशोर शिंदे यांना अमृतसर येथे वीरमरण

Indian soldier Kishore Shinde Niphad dies at Amritsar Nashik News
Indian soldier Kishore Shinde Niphad dies at Amritsar Nashik News esakal

निफाड (जि. नाशिक) : तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील असणाऱ्या नांदुर्डी गावातील किशोर गंगाराम शिंदे वय (३३) हा तरुण अमृतसर येथे सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असताना मंगळवारी १२/४/२०२२ दुपारी या वीर जवानाला अपघाती वीर मरण आल्याने नादुंर्डी गावावर शोककळा, तर शिंदे कुंटूबावर या अचानक आलेल्या प्रसंंगाने दुःखाचे गडद सावट पसरले आहे. पत्नी काजल व दिड वर्षाच्या मुलगी वेदिका सह‌ अमृतसर येथील बीएसएफ च्या कॅम्पमध्ये राहणाऱ्या किशोरच्या जाण्याने रासाका येथे कार्यरत असणारे साखर कामगार वडील गंधाधर केदु शिंदे, आई अनुसया गंगाधर शिंदे, लहान भाऊ संकेत गंगाधर शिंदे असा परिवार असून घरात मोठा असल्याने घरातील कर्ता पुरूष गेल्याने शिंदे कुटूंबाचे दुःख हलके करण्यासाठी नादुंर्डी सह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी करून शिंदे कुटुंबाचे सांत्वन केले.

Indian soldier Kishore Shinde Niphad dies at Amritsar Nashik News
नाशिक : पंचवटीत चालत्या मारुती कारने घेतला पेट

तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर शिंदे यांचे पार्थिव हे अमृतसर येथून दिल्लीला विमानाने आणले असल्याचे समजते, तर तेथून मोटारीने त्यांचे पार्थिव घेऊन बीएसएफचे जवान हे नादुंर्डी कडे रवाना झाल्याचे समजते. त्यांचे पार्थिव नांदुर्डीकडे जाण्यास जवळपास 24 तास लागणार असल्याने उद्या होणारा त्यांचा अंत्यसंस्कार सदर वाहन येताच होण्याची शक्यता असल्याचे समजते .सतीश कुमार नावाचे सैन्य दलाचे अधिकारी पर्थिवसमवेत आहेत असे निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले आहे. तरी नांदुर्डी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने मोकळ्या पटांगणात चबुतरा व मंडप टाकण्याचे काम नांदुर्डी ग्रामपालिका, नांदुर्डी तलाठी कार्यालय, रानवड मंडल अधिकारी, नांदुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व किशोर शिंदे यांचे शालेय मित्र हे जातीने लक्ष ठेवून सदर अंतिम संस्काराची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Indian soldier Kishore Shinde Niphad dies at Amritsar Nashik News
जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षण विभागाचं दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com