लासलगाव- भारतातील मातीत तयार होणाऱ्या फळांनी आता जागतिक बाजारपेठेतील रसिकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारताने तब्बल ४.१५ लाख टन प्रक्रियायुक्त फळे, ज्यूस आणि काजू परदेशात पाठवून ५,०३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळविले आहे. ही यशोगाथा केवळ शेतकऱ्यांच्या परिश्रमांची नाही, तर भारताच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाची आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हतेचीही साक्ष आहे.