Crime
sakal
इंदिरानगर: घर विकत देण्याच्या आमिषाने तब्बल ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ऑटो कन्सल्टंटसह एकूण पाच जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विजय शांतिलाल पाटणी (५२, रा. गंजमाळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.