इंदिरानगर: छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोविंदा रे गोपाळा, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाच्या घोषणा सोबत ढोलपथकाचे सादरीकरण आणि परिसरातील बालकांच्या बहारदार नृत्यविष्काराने राणेनगर येथे शिवसेना उबाठा पक्षातर्फे निष्ठेची दहीहंडी उत्सव पार पडला. तब्बल आठ थर लावत मुंबईच्या ओम साई माऊली पथकाच्या गोविंदांनी ही हंडी फोडत १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जिंकले.अत्याधुनिक ध्वनियंत्रणा आणि रोषणाई यंदाचे विशेष आकर्षण होते.