esakal | VIDEO : "या महाराजांचा स्वॅगच वेगळा !" दिलगिरी व्यक्त केल्यानंतर इंदोरीकर महाराजांचे आडगावात जल्लोषात स्वागत...

बोलून बातमी शोधा

Indorikar1111.jpg

अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी (ता.१८) नाशिकच्या आडगावात किर्तनासाठी पोहचले. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु होता.यावरून इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

VIDEO : "या महाराजांचा स्वॅगच वेगळा !" दिलगिरी व्यक्त केल्यानंतर इंदोरीकर महाराजांचे आडगावात जल्लोषात स्वागत...
sakal_logo
By
योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी (ता.१८) नाशिकच्या आडगावात किर्तनासाठी पोहचले. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  बैलगाडीवरून महाराजांनी गावात एंट्री केल्यानंतर एकंदरीत ग्रामस्थांमधील जोश बघण्यासारखा होता. 


इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं

हेही वाचा > "मी बोललो ते ग्रंथाच्या आधारानेच...गेले २६ वर्ष मी महिलांना उपदेश केले ते तुमचा मुलगा असल्याचे सांगूनच...


मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु होता.यावरून इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...