"मी बोललो ते ग्रंथाच्या आधारानेच...गेले २६ वर्ष मी महिलांना उपदेश केले ते तुमचा मुलगा असल्याचे सांगूनच...

indurikar-maharaj.jpg
indurikar-maharaj.jpg

नाशिक : मी बोललो ते ग्रंथाच्या आधारानेच... गेले 26 वर्ष मी महिलांना उपदेश केले ते तुमचा मुलगा असल्याचे सांगूनच... तरीही अर्थाचा अनर्थ करून मला संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. या त्रासामुळे चार दिवसांत जॅम झालोय. आता वाटतं, बस झालं... हे सगळे सोडून फेटा काढून ठेवावा अन्‌ शेती करावी, असे उदिग्न उद्‌गार प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शनविारी (ता. 15) काढले. 

प्रबोधनकार इंदुरीकरांची भूमिका, चुकीचे बोललो नसल्याचे अनकाईत भाष्य 

अनकाई येथे सरपंच डॉ. सुधीर जाधव यांच्या पुढाकाराने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सत्कार सोहळ्यानिमित्त झालेल्या कीर्तनात त्यांनी ही भूमिका मांडली. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते, असे वक्तव्य केल्याने टीकेचे धनी होऊन अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपली भूमिका मांडली. आजकाल जवळचेच विश्‍वासघातकी ठरत असून, मित्र अन्‌ भाऊबंद दगाबाजी करत असल्याच्या अनेक घटना उघड होत आहे, असे सांगत मोबाईलमुळे तरणाई अभ्यास अन्‌ आपल्या करिअरपासून दुरावल्याचे ते म्हणाले. 

माझ्याविरोधात रान पेटविले जात आहे.

मी जे सांगितले ते अनेक ग्रंथात उल्लेखलेले आहे. त्यामुळे त्याला चूक म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र उभारले जात आहे. या वादामुळे मला खूप त्रास होत असून, कुटुंबकलह सुरू आहे. माझं पोरगं आणि पोरगीही शाळेत जात नाहीय. 26 वर्षांपासून गावोगावी कीर्तन करत फिरतोय, मी जे बोलतो ते पुराव्यावर आधारित बोलतो. मी तुमचा मुलगा आहे, कधीही चुकीचे बोलणार नाही. पण आता यूट्युबवरून क्‍लिप घेऊन माझ्याविरोधात रान पेटविले जात आहे. 26 वर्षे कधी असे माझ्या बोलण्यावरून काही घडले नाही आणि आजच असे काय घडले, असा प्रश्‍न करत मी कशात सापडेना म्हणून मला अडकविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. महाराज संपणार नाही, हे ध्यानात घ्या. मी प्रसार माध्यमांशीसुद्धा यावर बोलणार नाही आणि चार दिवसांत बोललोही नाही. आपली सहन करायची कॅपेसिटी संपलीय. एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, तर फेटा काढून शेती करणे पसंत करीन, असे ते म्हणाले. 

इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, शिक्षण व आरोग्य सभापती सुरेख दराडे, कृषी सभापती संजय बनकर, स्थायी समिती सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रय आहेर, मर्चंट बॅंक अध्यक्ष अरुण काळे, आशा साळवे, तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल येवला तालुका मराठी पत्रकार संघाचा सत्कार डॉ. सुधीर जाधव व अनकाई ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधर जाधव यांचाही अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. सुधीर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com