वीटभट्टी व्यवसायाला महागाईचे चटके; मागणीत घट

Hut
Hutesakal

जुनी शेमळी (जि. नाशिक) : ग्रामीण भागात बांधकाम (Construction) क्षेत्रात सर्वांत महत्त्वाचा घटक असलेला वीट व्यवसाय आता महागाईमुळे धोक्यात आला आहे. रणरणते ऊन आणि वीटभट्टीच्या तप्त वातावरणात दिवसाला तब्बल एक हजार विटा तयार करणाऱ्या जोडप्याला महागाईचे चटके चांगलेचे भेडसावत आहेत. वीटभट्टीसाठी लागणारा सर्वच कच्चा माल महागाईच्या विळख्यात सापडल्याने वीटभट्टी आचके देत आहे. पावसाळा तोंडावर असताना विटांना मागणी घटल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत. (Inflation hits brick Making business Raw material price hike Decline in demand Nashik News)

किरातवाडी (ता. बागलाण) गावाजवळील रस्त्यालगत पोटापाण्यासाठी भटकंती करत स्थिरावलेले बाविस्कर जोडपं वीटभट्टीत मोलमजुरी करतात. पारंपरिक कुंभार व्यावसायिक असलेल्या या जोडप्याने उदरनिर्वाहासाठी वीटभट्टीचा व्यवसाय थाटला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भरउन्हात काबाडकष्ट करतात. आज ना उद्या कष्टाला यश मिळेल, या आशेवर हे दोघे दिवसाला एक हजार विटा पाडतात. मात्र महागाईच्या विळख्याने हा व्यवसाय अधिक खोलात जात आहे. कष्ट अधिक आणि मोबदला कमी यामुळे दुहेरी चटके सहन करावे लागत आहेत.

Hut
कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल; कमी भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

किरातवाडी येथील लहानशा आदिवासी वस्तीलगत नाशिक येथील भूमिहीन कुंभार व्यावसायिक सतीश बाविस्कर व सरला बाविस्कर यांनी वीटभट्टीसाठी २५ हजार रुपये भाडेतत्वावर व्यवसाय सुरू केला. निवाऱ्याची सोय म्हणून झोपडी उभारली. सुखाचे दिवस येतील या अपेक्षेने बाविस्कर जोडपं अपार मेहनत घेत आहेत. भरउन्हात पती-पत्नी डोक्यावर माती वाहत दिवसाला एक हजार विटा थापतात. विटांना मागणी घसरल्याने हे दोन्ही जीव रडकुंडीला आले आहेत. पावसाचे यंदा लवकर आगमन होणार असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विटांचा भाव आकारानुसार निश्चित होतो. सध्या लहान वीट आठ हजार प्रति हजार तर व मोठी विट १६ हजार रुपये प्रतिहजार विक्री होत आहे.

Hut
Nashik : अमेरिकेत मराठी शाळांमध्ये शिवरायांचा जयघोष

अतिशय कष्टाचे काम असल्याने या व्यवसायाला मजूर मिळत नाही. वीट बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. दगडी कोळसा, लाकूड बॉयलर, काळी व रवेदार माती, जाड माती, राख, खडवण, घेसू, खोके, पाणी ट्रॉली, वाहतूक आदींचे भाव वधारले आहेत. वीट भाजण्यासाठी महिना लागतो. वीट तयार करण्यापासून ते भाजण्यासाठी रचणे यासाठी कुशल मजूर लागतो. मजूर व कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे व्यवसायाला फटका बसत आहे. सगळ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. एक हजार वीट बनवताना तब्बल सात हजार खर्च येतो. त्यातून निव्वळ हजार रुपये नफ्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. या मोबदल्यात कुटुंबातील मुला-मुलींचे संगोपन करायचे कसे? एक मुलगा व एक मुलगी सध्या नाशिक येथे शिक्षण घेत असून, आजी- आजोबा त्यांचा सांभाळ करतात. त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा आणि पोटाचा प्रश्न मिटवायचा कसा, यामुळे वीट व्यावसायिक त्रस्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com