Nashik News : मालेगावात तोतापुरी कैरीची आवक वाढली! लाखोंची उलाढाल

Totapuri Kairi
Totapuri Kairiesakal

मालेगाव (जि. नाशिक) : येथील बाजारात कैरी विक्रीसाठी येण्यास सुरवात झाली आहे. महिन्यापासून कैरी विक्रीसाठी येत असून ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात रोज दहा टन कैरीची आवक असून यात आंध्रप्रदेशातून येत असलेली तोतापुरी कैरीला ग्राहक पसंती देत आहेत. कैरी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. (Inflow of Totapuri Kairi increased in Malegaon Millions of turnover Nashik News)

जानेवारी महिन्यापासून भाजीपाला बाजारात कैरी दाखल झाली आहे. जानेवारीत रोज तीन क्विंटल कैरी विक्रीसाठी येत होती. सुरवातीला कैरीने शंभरी ओलांडली होती. सध्या कैरी स्वस्त झाल्याने प्रत्येक हातगाडीवर दिसत आहे.

आवक वाढल्याने प्रतिदिन दहा टनापर्यंत तोतापुरी कैरीची विक्री होत आहे. घाऊक बाजारात १६ ते २२ रुपये किलोपर्यंत कैरी विकली जात आहे. किरकोळ बाजारात किलोसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत.

कसमादे परिसरातील गावठी कैरी एप्रिल महिन्यात बाजारात येण्यास सुरवात होते. कसमादेतील कैरी दाखल झाल्यानंतर तोतापुरी कैरीची मागणीत घट होऊ शकेल. येथे एप्रिलमध्ये गावठी व परराज्यातील कैरीची रेलचेल असेल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Totapuri Kairi
Ram Navami : गा बाळांनो श्री रामायण! अमेरिकेत रामनवमी निमित्त बाळगोपाळांनी सादर केले गीत रामायण

रोज ३० ते ४० टनापर्यंत आवक वाढण्याचा अंदाज आहे. यंदा अवकाळी पावसामुळे गावठी कैरीचे नुकसान झाले. त्यामुळे कैरीचे भाव स्थिर राहतील अशी माहिती मातोश्री ट्रेडींगचे संचालक महेंद्र वाघ यांनी दिली.

शहराच्या पूर्व भागात सर्वाधिक विक्री

शहरातील मुस्लीम बहुल असलेल्या पूर्व भागात शाळा व चौकाचौकात तोतापुरी कैरी विकली जात आहे. कैरीच्या फोडी करून त्यांची विक्री केली जाते. परिसरातील शाळेजवळ व चौकाचौकात खाद्यपदार्थांची शेकडो लहान-लहान दुकाने आहेत. सध्या तोतापुरी कैरी मालेगावकरांच्या चवीला उतरली आहे.

Totapuri Kairi
State Level Cricket Tournament : नाशिकचा एक डाव 9 धावांनी मोठा विजय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com