गांधीनगरला मुद्रणालयात डायरेक्टर जेपी सरकार यांची पाहणी | nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर मुद्रणालय

गांधीनगरला मुद्रणालयात डायरेक्टर जेपी सरकार यांची पाहणी

नाशिक रोड : एके काळी मोठी सुबत्ता असलेल्या गांधीनगर येथील मुद्रणालयाला उतरती कळा लागलेली असताना येथील साधन सामुग्रीत प्रशासनाने बदल न केल्याने जीर्ण झालेल्या मुद्रणालयाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी सध्या नवनवीन पावले उचलली जात आहे. शहरी विकास मंत्रालयाच्या प्रिंटिंग विभागाचे संचालक जी.पी. सरकार यांनी आज गांधीनगर प्रेस व वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी केली. आधुनिकीकरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगून, चार महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : नागरिकांनो, स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रतिसाद नोंदवा

तीन वर्षांपूर्वी खासदार हेमंत (MP Hemant Godse) गोडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे मुद्रणालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला होता. मुद्रणालयाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कामगार, छपाई प्रेस आणि कामगार कॉलनीची कशी दुरवस्था झाली आहे, हे खासदार गोडसे यांनी वेळोवेळी शहरी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री हरदिपसिंग पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या लक्षात आणून दिले होते. या प्रेसचे अत्याधुनिकरण केल्यास पुन्हा सेंट्रल गर्व्हमेंटच्या स्टेशनरींची छपाई सुरु होऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळू शकेल. तसेच जीर्ण झालेली साधन सामग्री आणि आवारातील इमारतींना झळाळीचे वैभव मिळू शकेल, अशी भूमिका खासदार गोडसे यांनी पटवून दिल्याने मुद्रणालयाच्या आधुनिकीकरण संदर्भात केंद्राने हिरवा कंदील दाखवत सुमारे चारशे कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा: नाशिक : स्मार्टसिटीची २२ पैकी फक्त ८ काम पूर्ण; वर्षभर चालणार काम

प्रत्येक महिन्याला छपाई विभागाचे संचालकांची गांधीनगर मुद्रणालयात भेट असते. ही नियमित भेट होती. मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणाच्या कामाला गती मिळावी, यासाठी शहरी विकास मंत्रालयाच्या छपाई विभागाचे संचालक जी.पी. सरकार यांनी रविवारी (ता.१८) गांधीनगर प्रेस व वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी केली. आधुनिकरणाच्या माध्यमातून कॉलनीमधील जीर्ण झालेल्या इमारतींचे नूतनीकरण, कालबाह्य आणि जीर्ण झालेल्या मशिनरीच्या जागी आधुनिक मशिनरी बसविण्यात येऊन रोजगार निर्मितीस चालना देण्यात येणार असल्याची माहिती सहकार यांनी दिली. नॅशनल बिल्डिंग बांधकाम कंपनीने अत्याधुनिकरणाच्या कामाचे व्हॅल्युएशन काढून दिले असून येत्या चार महिन्यात कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. येत्या काही महिन्यात आधुनिकरणाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती श्री. सरकार यांनी दिली. यावेळी प्रेसचे व्यवस्थापक बी.के. सहानी, युनियनचे अध्यक्ष राम हरक, जनरल सेक्रेटरी रवी आवारकर, उपाध्यक्ष गणेश रोकडे, जॉ. सेक्रेटरी के.एस. व्यंकटेश, खजिनदार समद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inspection Of Director Jp Sarkar At Gandhinagar Press In Nashik Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..