दिंडोरीच्या ताराबाईंच्या संसाराला कष्टाचं थिगळं

tarabai bhillore
tarabai bhilloreesakal

जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच नियतीनं कुंकू हिरावलं... परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीनं परिस्थितीशी दोन हात करत कुटुंबातील चिमुकल्यांसाठी आधार बनताना जणू संकटांची मालिकाच नशिबी आली. मात्र परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या आत्मविश्वासावर (Confidence) परिस्थितीलाच गुलाम बनविणाऱ्या दिंडोरी येथील ताराबाई भिलोरे यांनी भाजीपाला विक्रीतून (Vegetables selling) कुटुंबाला संस्कारक्षम बनवितानाच इतरांसाठी आदर्श उभा केलाय. (Inspirational story of vegetable seller Tarabai Bhilore from dindori Nashik news)

ताराबाई यांचे माहेर कळवण येथील, तर सासर चांदवड तालुक्यातील वादव-हाडी... सध्याचे वास्तव्य दिंडोरीतील विजयनगरमध्ये). वडील संतोष भिका गोडसे यांचे पत्नी जयाबाई आणि दोन मुली असे चौकोनी कुटुंब... मात्र माहेरी परिस्थिती बेताचीच असल्याने भाकरीच्या शोधात गाव सुटले. ताराबाई यांचे शिक्षण जुनी मॅट्रिक. शिकून मोठे होतानाच नोकरीची संधी असूनही वडिलांची परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांमुळे वडिलांनी ताराबाई यांचे लग्न करून दिले. पती हिरामण रामचंद्र भिलोरे यांचे शिक्षण पदवीपर्यंतचे... मविप्र समाज संस्थेमध्ये लिपिक. मात्र त्या काळी तुटपुंज्या पगारावर असलेल्या हिरामण भिलोरे यांची परिस्थिती जेमतेमच होती. नोकरीनिमित्ताने ताराबाई यांचे कुटुंब दिंडोरीत आले. तेव्हा पतीची बदली निफाडमध्ये होती. जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवून ताराबाई यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. याच काळात भिलोरे कुटुंबात मुलगी स्वाती, ज्योती, शीतल आणि विलास या मुलांमुळे कुटुंबाची सदस्यसंख्या वाढली.

दशक्रियाविधीच्या दुसऱ्या दिवशीच कामासाठी बाहेर

कुटुंबासमोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जात असतानाच पती हिरामण यांचे एका दुर्घटनेत निधन झाले. भिलोरे कुटुंबावर झालेला आघात वेदनादायी होता. मात्र चौघेही मुलांसाठी यापुढे आपणच आधार आहोत, याची जाणीव ठेवून ताराबाई यांनी कुटुंबाची धुरा आपल्यावर घेत मुलांना आधार दिला. पतीच्या निधनानंतर दशक्रियाविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ताराबाई यांनी कुटुंबाला आधार म्हणून दिंडोरीत रस्त्यावर बसून भाजीपाला विक्रीला सुरवात केली. दिंडोरी येथील बाजार पटांगणात माणुसकीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या विक्रेत्यांना ताराबाई यांच्या दुःखाची जाणीव असल्याने भिलोरे कुटुंबासाठी आधार देतानाच दुःखातून बाहेर काढण्यासाठी मोठा आधार दिला.

ताराबाई यांच्या संघर्षात माहेरच्या मंडळींसह बाजार पटांगणातील नागरिकांनी दिलेला आधार खूप मोलाचा होता, असे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. आयुष्याच्या वाटचालीत आलेलं दुःख पचवत ताराबाई यांनी कुटुंबाला भाजीपाला विक्रीतून उभे करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. पतीच्या निधनानंतर केवळ तेरा दिवसांनंतर घराबाहेर पडलेल्या ताराबाई यांना भाजीपाला विक्रीतून पहिल्याच दिवशी खर्च वजा जाता १५० रुपयांची कमाई झाली आणि येथूनच खऱ्या अर्थाने ताराबाई यांनी आपल्या नव्या जगाला सुरवात केली.

tarabai bhillore
मतदार याद्या प्रसिध्दीकडे लक्ष; अंतिम यादी 7 जुलैला

मुलांसाठी धावल्या

कुटुंबावर आलेल्या प्रसंगांत मुलांना आधार देतानाच परिस्थितीची वेळोवेळी जाणीव करून देत असतानाच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. आईची तळमळ पाहून मुलांनीही विश्वास सार्थ ठरवत स्वतःला सिद्ध केलंय. शिक्षण पूर्ण करतानाच मुलांचीही झालेली मदत ताराबाईंना या व्यवसायात भक्कमपणे उभी करून गेलीय. मुलगी स्वाती गायकवाड, येवला येथील ज्योती शेलार, शीतल गायकवाड, तसेच मुलगा विलास आज आपापल्या पायावर उभे आहेत. भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात आज सून प्रज्ञा यांचीही त्यांना मोलाची मदत होते. भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून मुलींचे विवाह, शिक्षण, तसेच मुलाला बांधकाम व्यवसायात उभे करून देत स्वतःची दिंडोरी येथील बाजारात उभी केलेली ओळख नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यात आलेल्या प्रसंगांतून खचून न जाता त्यावर मात करताना वाट्याला आलेल्या दुःखाचा निश्चितच अंत असतो, या सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर ताराबाई यांनी खेचून आणलेलं यश कुटुंबासाठी अभिमान वाटावा असेच आहे.

tarabai bhillore
जुलैपासून डास आढळणाऱ्या घरांना दंड; साथ रोग प्रतिबंधाची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com