हमाल ते बांधकाम कंपनीचा मालक माळमाथ्यावरील तरुणाची गगनभरारी

avinash shirsath
avinash shirsathesakal

(रिपोर्ट - हंसराज देसाई)

कळवाडी (जि.नाशिक) : माळमाथ्यावरील अस्ताने या लहानशा गावातील गरीब कुटुंबात १९७५ मध्ये जन्माला आलेला अविनाश शिरसाठ यांनी घरात अठराविश्व दारिद्र्य असताना मालेगावला अकरावीत शिकत लूम कारखान्यावर सुताच्या गाठी उचलण्याचे काम केले. नंतर विविध कामे, पोलिस दलात जवान असा संघर्ष करत अविनाश शिरसाठ जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले आहेत. (Inspiring-journey-of-Avinash-Shirsath-from-Astane-nashik-marathi-news)

माळमाथ्यावरील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला

राजे शाहू शंभो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक या कंपनीचे ते मालक आहेत. कंपनीच्या माध्यमातून शेगाव देवरी राष्ट्रीय महामार्ग, एशियन टेक्नॉलॉजीचा भारतातील पहिला सेव्हेज ट्रीटमेंट प्लांट गुजरातमधील जामनगरमध्ये बांधकाम केले आहे. मालेगाव ते कुसुंबा असा ४२ किलोमीटरचा दर्जेदार रस्ता बनविला आहे. कंपनीच्या माध्यमातून माळमाथ्यावरील अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या गावावरील विशेष प्रेमापोटी गावात विधायक कामे व्हावीत, या हेतूने अविनाश यांनी अनेक वर्षांपासून अर्धवट असलेल्या स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास नेले. त्या परिसरात स्वखर्चाने १०० झाडांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण केले. गावातील मराठी शाळेला दहा लाखांची मदत केली. ॲम्पथी फाउंडेशनची एक कोटीची शाळा मंजूर करून घेतली.

तरुणांसाठी आदर्श

कायमच गाव व परिसरातील गरीब रुग्णांना मुंबईपर्यंत दवाखान्यात नेण्याचे काम, कोविडमध्ये नाशिकमधील गरीब वस्तीत तसेच मंदिराबाहेरील गरिबांना जेवणाची पाकिटे, शिवसृष्टी फाउंडेशनतर्फे गावोगावी रक्तदान शिबिरे, इंजेक्शन, प्लाझ्मा पुरवणे इत्यादी समाजोपयोगी कामे करत आहेत. यामुळे स्वतःच्या गावात ग्रामस्थांनी अविनाश शिरसाठ यांना बिनविरोध सरपंचपदी निवडून दिले. मालेगावला हमाली करून शिक्षण घेत असताना कृषिमंत्री दादा भुसे, बंडूकाका बच्छाव, संदीप पाटील, सुनील गायकवाड, प्रमोद बच्छाव, संग्राम बच्छाव अशा मित्रपरिवारात राजकीय व औद्योगिक बाळकडू मिळत गेले. आजही अनेक तरुण त्यांना आदर्श मानतात.

avinash shirsath
नाशिकचा उन्हाळ कांदा खाणार सलग तिसऱ्या वर्षी ‘भाव'!

अविनाश शिरसाठ माळमाथ्यावरील उद्योन्मुख, समाजाभिमुख नेतृत्व असून, अनेक सामाजिक कार्ये ते हिरीरीने पार पाडत आहेत. कोरोनाकाळात त्यांनी केलेले कार्य व धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री

एक पोलिस स्वतःच्या हिमतीवर, आत्मविश्वासावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून मोठी झेप घेतो. अविनाशचा फक्त कॉन्स्टेबल लोकांनी नव्हे, तर आयपीएस लोकांनीही आदर्श घ्यावा. पूर्ण महाराष्ट्र पोलिस दलाला त्यांचा अभिमान आहे. - प्रताप दिघावकर, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com