नाशिक- चार कोटींचा विमा लाटण्यासाठी भिक्षेकरी यास चिरडून ठार मारल्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने अखेरीस विमाधारकाचा खून करणाऱ्या मुख्य संशयितास साडेतीन वर्षांनी सोमवारी (ता.१४) शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. दरम्यानच्या काळात संशयित साडेतीन वर्षे त्र्यंबकसह परराज्यात वेशांतर करून वास्तव्य करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. योगेश राजेंद्र साळवी (३१, रा. वैष्णव रोड, मालेगाव स्टँडजवळ, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.