esakal | नाशिक : गुप्तचर विभागाकडून परमबीर सिंग यांच्या जमिनीचा शोध | Parambir Singh
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh

नाशिक : गुप्तचर विभागाकडून परमबीर सिंग यांच्या जमिनीचा शोध

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : बेपत्ता असलेल्या माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग (parambir singh) यांचा गुप्तचर विभागाकडून शोध सुरु आहे. सोबतच नाशिकला त्यांची जमीन असल्याच्या तक्रारीवरून त्यांच्या भागादारीच्या जमिनीचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडे परमबीर सिंग यांच्या विरोधात करण्‍यात आलेल्या तक्रारीत त्यांची गुजरात येथील एकाच्या नावाने नाशिक जिल्ह्यात जमीन असल्याच्या तक्रारीची सध्या खात्री करून घेण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून संजय पुनुमिया हे त्यांचे भागीदार असून पुनुमिया व परमबीर सिंग भागीदारीतून नाशिक जिल्ह्यात मालमत्ता घेतल्याची तक्रार आहे. त्या तक्रारीची खातरजमा करण्याचे काम राज्य गुप्तचर विभागाकडून सुरु असल्याचे समजते.

परमबीर सिंग यांच्या विरोधातील तक्रारीनुसार पुनुमिया याची इगतपुरी व सिन्नर तालुक्यात धामणगाव, मीरगाव पाथरे या भागात जमीन आहे. त्याविषयी पोलिस यंत्रणेकडून माहिती घेतली जात आहे. त्यानुसार सोमवारी (ता.११) या भागात जाऊन जागेची तसेच नोंदणी विभागात जाऊन यंत्रणेकडून माहिती घेण्यात आली. शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे, हा महाराष्ट्रात नियम आहे. पुनुमिया याने शेत जमिनीसाठी शेतकरी म्हणून दाखले दिले आहेत का, असल्यास तो शेतकरी आहे का, या आणि अशा विषयी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासी यंत्रणेकडून माहिती घेतली जात असल्याचे समजते.

हेही वाचा: डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

loading image
go to top