नाशिक : उघड्या रहाडीमुळे अपघातास निमंत्रण

Invitation to accident due to open Rahad
Invitation to accident due to open Rahad esakal
Updated on

जुने नाशिक : रंगपंचमीनिमित्त जुनी तांबट गल्ली येथे पेशवेकालीन रहाड (Rahad) उघडण्यात आली होती. रंगपंचमी (Rangpanchami) होऊन तब्बल सोळा दिवस अर्थात अर्धा महिना उलटला तरीदेखील अद्याप रहाड बंद केलेली नाही. उघडी रहाड अपघातास निमंत्रण देत आहे. महापालिका (NMC), मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलिस विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या.

रंगपंचमीनिमित्त पंचवटी (Panchavati), शनि चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक तसेच जुनी तांबटलेन येथील रहाड खुल्या करण्यात आल्या होत्या. २२ मार्चला रंगपंचमी साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागातील नागरिकांनी रहाडीत रंग खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जुनी तांबटलेन येथील रहाड वगळता अन्य राहाडी बंद करण्यात आल्या. तेथील वाहतूकदेखील सुरळीत झाली. याउलट जुनी तांबटलेन येथील रहाड अद्यापही धोकादायक अवस्थेत उघडीच आहे. अपघातास निमंत्रण देत आहे. रहाडीच्या तीन बाजूस लोखंडी पाइप बांधून बॅरॅकेटिंग करण्यात आली आहे. चौथी बाजू मात्र उघडीच आहे. अशा वेळेस रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहनधारक किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांचा रहाडीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

Invitation to accident due to open Rahad
माणुसकीला काळीमा फासणारी घटना; संशयिताला अटक

दुसरीकडे बॅरॅकेटिंग करण्यात आलेल्या पाइपमधील अंतर मोठे असल्याने परिसरातील लहान मुले राहडीत डोकावत आहे. अशा वेळेस त्यांचादेखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही तर त्याच ठिकाणी महापालिका ठेकेदाराकडून पाइपलाइन कामाच्या नावाखाली काही भाग खोदून ठेवला आहे. खोदलेल्या भागाची सिमेंटयुक्त खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यावरून वाहने घसरून अपघात होत आहे. पाइपलाइनच्या कामासाठी अद्याप रहाड बुजवली नसल्याचे सांगण्यात आले. असे जर असेल तर काम घेतलेल्या ठेकेदाराने त्या ठिकाणी काम सुरू केले पाहिजे. त्याच्याकडून काही कामे सुरू केली जात नाही आणि रहाड काही बंद होत नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना घडल्यास यास कोण जबाबदार असणार, दुर्घटना होण्याची वाट बघितली जात आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. पाइपलाइनचे काम करून त्वरित रहाड बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Invitation to accident due to open Rahad
2 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com