जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

leopard
leopardEsakal

नामपूर (जि. नाशिक) : बिबट्या लोकवस्तीजवळ फिरकल्यावर केवळ पिंजरे लावून थांबण्यापेक्षा मनुष्य आणि बिबट्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने वन्यप्राणी तज्ज्ञांच्या सहाय्याने जिल्हा स्तरावर अभ्यास समिती स्थापन करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. तीन वर्षांतील बागलाण तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. (issue of human-leopard conflict is on the rise again in nashik district)

बागलाण तालुक्यातील वन विभागाच्या अखत्यारीतील जंगलात अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे. जंगलातील बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ मनुष्य वस्त्यांकडे फिरकू लागल्याने काही वर्षांत अनेक निष्पाप नागरिकांना बळी गेला आहे. शनिवारी (ता. ५) दरेगाव येथील युवा शेतकरी नंदकिशोर पवार यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने बिबट्या आणि मनुष्य संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तीन वर्षांपूर्वी तळवाडे भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात अडीच ते तीन वर्षांच्या दोन बालकांचा मृत्यू झाला होता. बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. शेतात घर करून राहणाऱ्या नागरिकांमध्ये मुक्तसंचार असणाऱ्या बिबट्याची प्रचंड दहशत आहे. जायखेडा येथील जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते यतींद्र पाटील यांनी बिबट्याच्या बंदोबस्ताबाबत नाशिक येथील जिल्हा वनसंरक्षक यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. बिबट्याच्या होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. धुळे व बागलाण तालुक्यांच्या हद्दीवर असणाऱ्या जंगलात बिबट्यासह कोल्हे, ससे, तरस, लांडगे, मोर, रानडुकरे आदी प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. परंतु, दिवसेंदिवस होत असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे जंगली प्राण्यांचा निवारा धोक्यात आला आहे. त्यामुळे जंगली प्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्त्यांकडे फिरकत असल्याचे चित्र आहे. याबाबत वन विभागाने व्यापक स्वरूपात जनजागृती करून प्रबोधन करणे गरजेचे आहे. 

काही वर्षांपासून मोसम खोऱ्यात वन विभागात बिबट्या व मनुष्य संघर्षांच्या घटना घडत आहेत. वन्य प्राणी जंगलाबाहेर लोकवस्तीजवळ फिरकल्यास काय करावे, याविषयी सध्या कोणतेही सर्वसमावेशक धोरण नसून बिबट्यासाठी पिंजरा लावणे किंवा त्याने पाळीव जनावर मारल्यावर स्थानिकांना नुकसानभरपाई देणे अशा उपायांनी मनुष्य आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष कमी होत नाही. संघर्ष झाल्यानंतर त्यावर उपाय योजण्यापेक्षा तो टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना राबविणे नितांत गरजेचे आहे.

leopard
नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

गावात बिबट्या दिसल्यावर घाबरून इकडे-तिकडे पळणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. स्थानिकांच्या या पळापळीमुळे बिबट्याही घाबरून पळतो. बिबट्या आणि स्थानिक दोघेही यात जखमी होतात. पाळीव जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी गावात गोठे बांधण्यासाठीच्या योजना असतात. त्या लोकांपर्यंत पोचवण्यात जिल्हा परिषद मदत करू शकेल. बिबट्याचा वावर असलेल्या भागात गोठ्यांना जाळ्या बसवणे, ग्रामस्थांना सायंकाळनंतर शेतात पाणी द्यायला जावे लागू नये, यासाठी त्या भागात भारनियमन न करणे गरजेचे आहे.

मोसम खोऱ्यात होणारी बेसुमार जंगलतोड हे देखील एक प्रमुख कारण आहे. बिबट्याचा मुक्तसंचार हा अलीकडच्या काळात सर्वाच्या चिंतेचा विषय बनला आहे. ऊस हे त्यांच्या अधिवासाचे आवडते ठिकाण. गेल्या काही वर्षांत जिल्हाभरात नागरी वसाहतीत भक्ष्याच्या शोधार्थ येणारा, भटकणारा बिबट्या आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातील संघर्षांचा तो केंद्रबिंदू ठरला. याबाबत वन विभागाने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

- यतींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य, जायखेडा 

leopard
‘माझी वसुंधरा’ अभियान : नाशिक महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com