ITI admission : ऑनलाइन प्रवेश अर्जात बदल करणे शक्य; अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iti.jpg

सर्वोच्च न्यायालयाच्या ९ तारखेच्या निर्णयाद्वारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या सामाजिक आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेतील आरक्षणामध्ये बदल करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. 

ITI admission : ऑनलाइन प्रवेश अर्जात बदल करणे शक्य; अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

नाशिक : (कनाशी) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीत दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी प्रवेश अर्जात ऑनलाइन दुरुस्ती २० सप्टेंबरच्या सायंकाळी पाचपर्यंत करू शकतात. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीत बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.dvet.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटी– एडिट ॲप्लिकेशनवर क्लिक करावे किंवा अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एम. पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ तारखेच्या निर्णयाद्वारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या सामाजिक आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेतील आरक्षणामध्ये बदल करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

प्रवेश अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे प्रवेशापासून वंचित, तसेच प्रवेश नाकारलेल्या उमेदवारांना प्रवेश अर्जात आता दुरुस्ती करता येणार आहे. शासन आदेश प्राप्त होताच पुढील सुधारित वेळापत्रक प्रकाशित होईल, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top