NSK26H31915
जळगाव : विमानतळावर स्वच्छता अभियानात सहभागी अधिकारी व कर्मचारी.
......
विमानतळावर यात्री सेवा अभियानात विविध उपक्रम
प्रवासी सुविधा अधिक देण्यावर भर; आपत्कालीन, विमानकंपनी हेल्पलाईन क्रमांक फलक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : भारत सरकार तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे आलेल्या सूचनांनूसार जळगाव विमानतळावर १७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत यात्री सेवा अभियाना राबविण्यात आले. यात विमानतळावरील प्रवाशी सुविधा अधिक सक्षम करण्यासोबत प्रवाशांकडून सेवेबाबत मत देखील जळगाव विमानतळ प्राधिकरणाने जाणून घेतले असल्याची माहिती जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी दिली.
जळगाव विमानतळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना त्रिपाठी पुढे म्हणाले, की या यात्री सेवा अभियानात विमानतळावर स्वच्छता मोहिमेत सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला. तसेच वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांना विमानतळाची भेट तसेच त्यांना भविष्यातील संधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विमानतळावर प्रवाशांच्या सुविधा सोबत प्रवाशांना विमानतळावर आपत्कालीन क्रमांक दर्शनीय भागात बोर्डावर लावले होते. यात विमानतळ प्राधिकरण, विमानकंपनी, वैद्यकीय मदत असे क्रमांकाचे डिजीटल बोर्ड बसविण्यात आले. तसेच अपंगासाठी देखील त्यांच्या वेगळे शौचालय तयार करण्यात आले आहे. तसेच दोन महिला बचत गटांचे स्टॉल येथे लावून खानदेशातील विविध पदार्थांच्या प्रसासार करण्यात आला अशी माहिती संचालक त्रिपाठी यांनी दिली.