जळगावच्या तरुणाकडे फायनान्सची सूत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय अर्थमंत्रालय
जळगावच्या तरुणाकडे फायनान्सची सूत्रे

जळगावच्या तरुणाकडे फायनान्सची सूत्रे

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच स्वाभाविकत: केंद्रीय अर्थमंत्रालयाची व्याप्तीही मोठी. या मंत्रालयाच्या जीएसटी आणि प्राप्तिकर अशा दोन्ही प्रमुख अर्थ घटकांशी संबंधित विभागातील समन्वयाची सूत्रे सध्या जळगावच्या तरुणाकडे आहेत. २०१०च्या बॅचचे आयसीएएस अधिकारी अमित भोळे यांची नुकतीच अर्थमंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती झालीय. खानदेशच्या मातीने राज्यालाच नव्हे तर देश, विदेश पातळीवरही विविध क्षेत्रात तज्ज्ञ दिलेत.

त्या-त्या क्षेत्रात कार्य करताना ही मंडळी आपल्या नावाचा ठसा उमटवितानाच खानदेशचाही नावलौकिक वाढवतेय. जळगाव जिल्ह्यातीलही हजारोंच्या संख्येने तरुण सरकारी आणि खासगी कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोचलेत. अमित गुणवंत भोळे हे मूळचे भादली (ता.जळगाव) तरुण त्यापैकीच एक. वडील निवृत्त वैद्यकीय अधिकारी, आई गृहिणी अशा सामान्य कुटुंबातील ते सदस्य. अभियांत्रिकीची पदवी बारावीपर्यंतचे शिक्षण जळगावी पूर्ण केल्यानंतर अमित यांनी पुण्यातून मेकॅनिकलमधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकीतील करिअर डोळ्यासमोर असतानाही त्यांना आवड होती ती सिव्हिल सर्व्हिसेसची.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

त्यामुळे त्यांनी मुंबईच्या सिडेन्हाम महाविद्यालयातून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी एलआयसी व युनायटेड वेस्टर्न बँकेतही अधिकारी सेवा बजावली. कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यांनी काम केले. सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुच ठेवली. २०१०मध्ये त्यांची आयसीएएस (Indian civil accounts service) मधून निवड झाली आणि त्यांनी केंद्रीय मंत्रालयात अधिकारिपदाची धुरा हाती घेतली. प्रशासकीय सेवेतील निवडीनंतरही त्यांची शिक्षणाप्रति ओढ संपली नाही. त्यांनी अर्थशास्त्रातून एम. ए. पूर्ण केले.

रेल्वे, वाणिज्य उद्योग मंत्रालय केंद्रीय प्रशासकीय सेवेत त्यांनी महत्त्वाच्या रेल्वे, वाणिज्य व उद्योग अशा तीनही मंत्रालयात सेवा बजावली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संजय धोत्रे यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. उपसचिवपदी नियुक्ती संजय धोत्रे यांच्याकडील सेवेनंतर आता अलीकडेच अमित यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे प्राप्तिकर आणि जीएसटी या दोन्ही करप्रणातीत समन्वय साधण्यासंबंधीचे काम आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

जीएसटी अथवा प्राप्तिकरासंदर्भात एखादा नवीन कायदा आणणे, अथवा कायद्यातील दुरुस्ती, सुधारणा यासंबंधी विधेयक सादर करण्याआधी आर्थिक विश्‍लेषण करणे असे त्यांच्या डेस्कचे प्रोफाईल. केंद्रीय मंत्रालयात अशा मोठ्या पदापर्यंत पोचलेले ते जळगाव जिल्ह्यातील बहुधा पहिले अधिकारी असावेत, असे मानले जातेय. ‘उमंग’ ॲपचेही केले काम केंद्र सरकारच्या माहिती- तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘उमंग’ ॲपचे कामही त्यांनी काही महिने सांभाळलेय. त्यामुळे केंद्रीय मंत्रालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचा त्यांना अनुभव घेता आला.

loading image
go to top