Jalgaon Crime News : बोदवड तालुका कृषी अधिकारी ताब्यात!

Jalgaon News : बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना सोमवारी (ता. ८) सायंकाळी शहरातील उजनी रस्त्यावर एका शेतात पाहणी करीत असताना नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal

Jalgaon News : बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना सोमवारी (ता. ८) सायंकाळी शहरातील उजनी रस्त्यावर एका शेतात पाहणी करीत असताना नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. पाडवी यांना साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेत आपल्या सोबत नेले असून, त्यांच्यावर राज्यभरात आर्थिक गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. (Bodwad Taluka Agriculture Officer in custody)

मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड आणि टेरर फंडिंगचा गुन्हा छगन पाडवी यांच्याविरोधात दाखल आहे. पाडवी यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने (२५ मे) फेटाळला असून, त्याच प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा आहे.

छगन पाडवी हे उजनी रस्त्यावरील एका शेतात पाहणीसाठी चालकाबरोबर गेल्यावर त्यांच्या वाहनाच्या पुढे वाहन लावून कृषी अधिकाऱ्यांना वाहनातून उतरवून दुसऱ्या वाहनात बसविण्यात आले. (latest marathi news)

Jalgaon Crime News
Pimpri Crime : विवाह मान्य नसल्याने दाजीचा खून; मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली

बोदवड पोलिसांना त्यांच्या चालकाने अपहरण झाल्याचे सांगितले. मात्र, तपासात त्यांचे भाचे व कुर्ला पोलिस कर्मचारी आणि या प्रकरणातील फिर्यादी नारसिंग पाडवी समोर आल्यावर अपहरणाच्या अफवांवर पडदा पडला.

नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बोदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली. नंदुरबार पोलिसांनी आम्ही चौकशी करून पुन्हा बोदवडला रवाना केल्याचे रात्री उशिरा सांगितले.

Jalgaon Crime News
Pune Crime : खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com