Jalyukt Shivar Abhiyan
sakal
नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने मंजूर केलेली १५ कोटी ९५ लाखांची ५८ कामे रद्द झाली आहेत. निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे या कामांची फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.