Jarif Baba Murder Case | जरीफ बाबांच्या बँक खात्याची तपासणी : अधीक्षक पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Rural SP Sachin patil Latest News

जरीफ बाबांच्या बँक खात्याची तपासणी : अधीक्षक पाटील

नाशिक : निर्वासित अफगाणी सुखी धर्मगुरू जरीफ बाबा चिश्ती यांची गोळ्या झाडून खून (Murder Case) केल्याप्रकरणी संशयितांच्या मागावर तपास पथक परराज्यात गेली आहेत. जरीफ बाबांच्या बँक खात्याची तपासणी करणार येत आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहितीतून तपासाला दिशा मिळू शकते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. (Jarif Baba Murder Case order of Investigation of Jarif Baba bank account by Superintendent sachin Patil Nashik Crime News)

येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसीत जरीफ बाबा यांच्या वाहन चालकासह सेवेकऱ्यांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) घडली होती. विशेष म्हणजे सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (वय ३५) यांची प्रॉपर्टीच्या वादातून खून केल्याचे समोर आले आहे. जरीफ हे सुफी धर्मगुरू होते. गेल्या चार वर्षांपूर्वी भारतात आले होते.

हेही वाचा: नाशिक : बालकल्याण कार्यालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

सिन्नर तालुक्यातील वावी येथे ते वास्तव्यास होते. सोशल मीडिया व यू ट्यूबवरील लाखो भक्तांकडून मिळणारी देणगी यावर त्यांचा उदरनिर्वाह होता. जरीफ हे निर्वासित असल्याने त्यांना भारतात मालमत्ता विकत घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांचा चालक, सेवेकरी व विश्वासू लोकांच्या नावाने अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले. जरीफ यांनी इतरांच्या नावे सुमारे तीन कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या होत्या. त्यांच्याकडील चारचाकी वाहनही त्यांच्या चालकाच्या नावे खरेदी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात जरीफ यांचा खून चालकासह इतर दोघांनी केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा: गॅस दरवाढ : नाशिकच्या ग्राहकांना महिन्याला 92 लाखांचा भुर्दंड

Web Title: Jarif Baba Murder Case Order Of Investigation Of Jarif Baba Bank Account By Superintendent Sachin Patil Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..