नाशिक : जावयाची गाढवावरुन धिंड; वडांगळीकरांची अनोखी प्रथा

Nashik
Nashikesakal

वडांगळी (जि. नाशिक) : भले मोठे दिमाखादार सुपाचे बाशिंग त्याला केरसुणींचा तुरा...लसण्याच्या मंडावळ्या...लाल अन् उन्हाळ कांद्याची माळ...फकलेल्या चप्पलांचा हार...नवरदेवाची अशी हटके वेशभूषा करून वडांगळीकरांनी जावयाची गाढवावरून धिंड काढली आहे.

मेहुण्यांनी फोन केला अन् जावई फसले

दोन वर्षाच्या कोरोना महामारी काळात वडांगळीकरांच्या होळी ते रंगपंचमी पर्यंत शिमगा साजरा करण्याच्या प्रथा अन् परंपरा बंद झाल्या होत्या. कोरोना महामारीच्या संकटातून सावरताना रंगपंचमीच्या दिवशी जावयाचा शोध घेवून गाढवावरून धिंड काढून परंपरा तेवत ठेवली आहे. यंदा शिमग्याला धुळवडीच्या दिवशी वीरांचा पाडवा साजरा करताना वीर मिरवणूकीला ग्रामस्थांनी नवा लुक दिला. त्यानंतर वडांगळीच्या मेहुण्यांनी जावयाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण धुळवडीनंतर चार दिवस झाले तरी जावई काही सापडेना. रंगपंचमीला सकाळी आठला काका खुळे, धनंजय खुळे, दाऊद खुळे, दत्तू ठोक, गणेश खुळे, महेश खुळे यांना सायखेडा (ता.निफाड) येथे गाढव आण्यासाठी पाठविले. गाढव मालकाला दोन हजार शंभर रुपयांची बिदागी दिली. परंतू गाढव पकडण्यासाठी मेहुणे मंडळीना कसरत करावी लागली. शेतमळ्यात चरत असण्याऱ्या गाढवाने सर्वांनाच पळता भुई थोडी केली. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर धनंजय खुळे यांच्या गाडीमध्ये गाढव वडांगळीला आणले. दुपारपर्यंत गाढवाला पहारा देत जावयाचा शोध सुरू झाला. शिवसेनेचे कार्यकर्ते गिरीश खुळे, गोट्या खुळे यांनी दाजी दौलत बाजीराव भंबोरे (रा.चितेगाव ता.निफाड) यांना फसवा फोन केला.

Nashik
नाशिक जिल्ह्यात दीड लाख वीजग्राहकांना बारा कोटींची दंड व व्याजमाफी

हिवरगावला रंगपंचमीच्या दिवशी शेतजमीनींच्या व्यवहाराचा बहाणा केला. दौलत भंबारे यांनी क्षणांचा विलंब न करता हिवरगाव गाठले अन् ते फसले. सासुरवाडीला अलगद सापडलेल्या जावयास प्रथेप्रमाणे वेशभुषा करून गाढवावर बसवले. सांयकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत बसस्थानक, शनिचौक, हनुमान मंदीर, महादेव मंदिर परिसर, गणेश पेठ ह्या मार्गे विविध रंगाची उधळण करत मिरवणूक काढली. दोन ट्रँक्टरमध्ये गुलाबी रंग अन् पाणी सोबत गाढवावर बसलेले जावई अशा थाटमाटात धिंडीचा आनंद वडांगळीकरांनी द्विगुणीत केला. अधून मधून जावयाचे घरासमोर होणार स्वागत पाहून जावयांचा चेहरा खुलत होता. चार तासांनंतर सासरे बाळासाहेब खुळे यांच्या घरासमोर आणून जावयाला स्नान घालण्यात आले. सासू सुनंदा खुळे, अश्विनी खुळे, कल्याणी खुळे, राणी खुळे, योगिता दंडगव्हाळ, सोनल क्षत्रिय, ज्योती कुलथे यांच्यासह महिलांनी लग्नाची गाणी गात स्नान केले. त्यानंतर सासरे ज्ञानेश्वर खुळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिपक खुळे यांच्या हस्ते नवीन पंचवस्त्रे देऊन जावयांचा सत्कार करण्यात आला.

Nashik
नाशिक जिल्ह्यात मेडिकल दुकानावर महिन्यात लागणार सीसीटीव्ही

''शेतजमीन घेण्याच्या बहाण्याने फसलो.'वडांगळीच्या मेहुण्याचा मानपान घेण्यास तयार झालो. फक्त जास्त हाल करू नका एवढीच अट ठेवली होती. वडांगळीकरांच्या स्वागताने भारावून गेलो.'' - दौलत भंबोरे, जावई चितेगाव ता.निफाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com