NGL26B04121
नाशिक : अहिंसा इन्स्टिट्यूटच्या जयकुमार गोहिलची विद्यापीठस्तरीय निवड झाल्याबद्दल गौरव करतांना मान्यवर.
-------
‘फ्लायटो अलर्ट’ तंत्रज्ञानाची विद्यापीठस्तरावर निवड
अहिंसा इन्स्टिट्यूटच्या जयकुमार गोहिलचे यश
सकाळ वृत्तसेवा
निमगूळ, ता. २४ : येथील अहिंसा इन्स्टिट्यूटच्या ‘आविष्कार २०२६’च्या स्पर्धेत १२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्याची नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब येथे आयोजित केलेल्या अविष्कार २०२६ विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या बी. टेक. विभागातील शुद्ध विज्ञान श्रेणीत जयकुमार गोहिल याच्या ‘फायटो अलर्ट’ या तंज्ञनाची विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे.
वनस्पतींच्या आरोग्यात होणाऱ्या बदलांची लवकर दृश्य स्वरूपात जाणीव करून देण्यासाठी विकसित केलेले कमी खर्चाचे, कागदावर आधारित रंगबदल तंत्रज्ञान आहे. यामध्ये अँथोसायनिन, कर्क्युमिन आणि या दोन्हींच्या मिश्रणाचा वापर करून तीन संवेदनशील विभाग तयार केले आहेत. वनस्पतींच्या सभोवतालच्या हवेतील घटकांच्या संपर्कात आल्यावर या विभागांमध्ये रंगछटांमध्ये बदल दिसून येऊ शकतात. पारंपरिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांप्रमाणे या तंत्रज्ञानाला बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक घटकांची आवश्यकता नसल्यामुळे, वनस्पतींच्या निरीक्षणासाठी ही एक सोपी आणि किफायतशीर पद्धत ठरू शकते. फायटो अलर्टचा मुख्य उद्देश वनस्पतींच्या आरोग्यातील संभाव्य बदल सहजपणे ओळखता यावेत आणि शेतकऱ्यांना पिकांचे निरीक्षण लवकर करण्यास मदत व्हावी हा आहे. टोमॅटो, कांदा आणि बटाटा या वनस्पतींवर केलेल्या प्राथमिक निरीक्षणांमध्ये चाचणीच्या परिस्थितीनुसार रंगांमध्ये आशादायक बदल दिसून आले आहेत. या तंत्रज्ञानाची विश्वासार्हता आणि परिणामकारकता निश्चित करण्यासाठी अद्याप अधिक संशोधन व चाचण्यांची आवश्यकता आहे. तरीही, परवडणारे आणि सहज वापरता येणारे कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने फायटोअलर्ट हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. वनस्पतींमधील अदृश्य संकेत दृश्य स्वरूपात समोर आणून संभाव्य पीकनुकसान कमी करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावणे, हीच ‘फायटो अलर्ट’ची संकल्पना असून, त्याची विद्यापीस्तरीय निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष राजेश मुनोत, संचालक सौरभ मुनोत, प्राचार्य डॉ. सागर मोरे, विभागप्रमुख डॉ. संदीप वेंडे, अविष्कार समन्वयक प्रा. विकास पाटील यांचे जयकुमार गोहिलला मार्गदर्शन लाभले.