esakal | जेईई ॲडव्हान्स्‍डची परीक्षा पुढे ढकलली; जुलै-ऑगस्‍टमध्ये शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

jee exam

जेईई ॲडव्हान्स्‍डची परीक्षा पुढे ढकलली; जुलै-ऑगस्‍टमध्ये शक्‍यता

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सध्याची कोरोना महामारीची परिस्‍थिती लक्षात घेता जेईई ॲडव्हान्स्‍ड-२०२१ (JEE Adavance Exam 2021) परीक्षा पुढे ढकलत असल्‍याची घोषणा खरगपूर येथील इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (IIT)ने केली आहे. ३ जुलैला नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलत असल्‍याचे बुधवारी (ता. २६) जाहीर करताना परीक्षेच्‍या सुधारित तारखेची घोषणा योग्‍य वेळी केली जाईल, असेही स्‍पष्ट केले आहे. (JEE-Adavance-Exam-postponed-nashik-marathi-news)

मेन्‍स परीक्षेची जुलै-ऑगस्‍टमध्ये शक्‍यता

दरम्‍यान, यापूर्वी स्‍थगित झालेल्‍या एप्रिल आणि मे महिन्‍यातील जेईई मेन्‍स परीक्षेचे सत्र जुलै-ऑगस्‍टमध्ये घेतले जाण्याची शक्‍यता आहे. जेईई मेन्‍स परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांची जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्‍या आधारे आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेश मिळतो. २०२१ च्‍या जेईई ॲडव्हान्स्‍ड आयोजनाची जबाबदारी खरगपूरच्या आयआयटीवर आहे.

हेही वाचा: जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी

जेईई मेन्‍स परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा

दरम्‍यान, यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च अशी दोन सत्रांत जेईई मेन्‍स परीक्षा झाली आहे, तर एप्रिल आणि मे महिन्‍यात नियोजित असलेली जेईई मेन्‍स परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा झाली होती. कोरोना महामारीच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेतला होता. नॅशनल टे‍स्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे एप्रिल व मेमधील जेईई मेन्‍स परीक्षांचे सत्र येत्‍या जुलै-ऑगस्‍ट महिन्‍यात घेतले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर ३ जुलैला नियोजित असलेली जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय खरगपूर आयआयटीने जाहीर केला आहे.

हेही वाचा: 'कपडे काढो' आंदोलनावर आपचे जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया;व्हिडिओ

‘नीट’ सप्‍टेंबरमध्ये होण्याची शक्‍यता

सीबीएसई व अन्‍य राज्‍य शिक्षण मंडळांतर्फे बारावीच्‍या परीक्षांसंदर्भात अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. सीबीएसईतर्फे जुलै किंवा ऑगस्‍टमध्ये निवडक विषयांची परीक्षा घेतली जाण्याची शक्‍यता आहे. अशात १ ऑगस्‍टला नियोजित असलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा पुढे ढकलली जाण्याची दाट शक्‍यता आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतल्‍या जाणाऱ्या या परीक्षांसाठी अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्‍यामुळे ऑगस्‍टऐवजी सप्‍टेंबरमध्ये ही परीक्षा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या संदर्भात एनटीएने मात्र अधिकृत घोषणा केलेली नाही.