JEE NEET Exam Timetable : ‘नीट’ परीक्षा 5 मेस, जेईई जानेवारी-एप्रिलमध्ये; जाणून घ्या वेळापत्रक

JEE NEET Exam
JEE NEET Examesakal

JEE NEET Exam Timetable : वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर आयोजित केल्‍या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर झाले आहे.

नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. त्‍यानुसार नीट परीक्षा ५ मेस, तर जेईई मेन्‍स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत पार पडणार आहे. (jee neet exam timetable nashik news)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीतर्फे राष्ट्रीय स्‍तरावर प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने ‘एनटीए’तर्फे परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असते.

तसेच, राज्‍यस्‍तरावर प्रवेश परीक्षांचे आयोजन करणाऱ्या संस्‍थांनाही त्‍यांच्‍या परीक्षांच्‍या तारखा निश्‍चित करण्यात सुविधा होत असते. या अनुषंगाने ‘एनटीए’ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी पुढील वर्षी २०२४ मध्ये घेणार असलेल्‍या परीक्षांचे नियोजन जाहीर केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा ऑनलाइन अर्थात संगणकावर आधारित असणार आहेत. या तात्‍पुरत्‍या तारखा असून, अंतिम सूचना संकेतस्‍थळावर वेळोवेळी जाहीर केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JEE NEET Exam
JEE NEET Exam : जेईए, नीटसाठी मोफत कोचिंग; जिल्हा परिषदेतर्फे या तारखेला परीक्षा

असे आहे २०२४ च्‍या परीक्षांचे वेळापत्रक

* जेईई मेन्‍स (सत्र पहिले)---------२४ जानेवारी ते १ फेब्रुवारी

* जेईई मेन्‍स (सत्र दुसरे) ----------१ ते १५ एप्रिल

* नीट (यूजी)------------------५ मे

* कॉमन युनिव्‍हर्सिटी एन्‍ट्रान्‍स टेस्‍ट (यूजी)---१५ ते ३१ मे

* कॉमन युनिव्‍हर्सिटी एन्‍ट्रान्‍स टेस्‍ट (पीजी)---११ ते २८ मार्च

* यूजीसी नेट प्रथम सत्र------------------------१० ते २१ जून

JEE NEET Exam
JEE NEET Exam Training : खुशखबर! आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोफत जेईई, नीट प्रशिक्षण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com