JEE NEET Exam : जेईए, नीटसाठी मोफत कोचिंग; जिल्हा परिषदेतर्फे या तारखेला परीक्षा

JEE NEET Exam
JEE NEET Examesakal

JEE NEET Exam : पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे ‘सुपर-५०’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या विद्यार्थीसंख्येत वाढ केली असून, २०२३-२४ व २०२४-२५ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी एकुण ११० विद्यार्थ्यांची जेईए व नीटसाठी निवड केली जाणार आहे. (for Free Coaching for JEE NEET Examination on 2nd July by ZP nashik news)

दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन दिव्यांग विद्यार्थीसुद्धा पात्र राहणार आहेत. यासाठी सध्या नोंदणी सुरू असल्याची माहिती नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.

उपक्रम निवड चाचणी परीक्षेचा अर्ज शाळांना पीडीएफ स्वरुपात देण्यात आला आहे. संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज करू द्यावा, अर्ज भरण्यासाठी सहाय्य करावे. विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात २६ जूनपर्यंत कागदपत्रांसह अर्ज जमा करावेत. प्रत्येक तालुकास्तरावर एक परीक्षा केंद्र राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JEE NEET Exam
JEE NEET Admission : खुशखबर! ग्रामीण विद्यार्थ्यांना जेईई- नीटची मोफत संधी; खर्च ZP करणार

येत्या २ जुलैला सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत ही परिक्षा होईल. त्यात उच्चतम गुण मिळविणाऱ्या पहिल्या ११० विद्यार्थ्यांची जेईए व नीट या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन व अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता निवड केली जाईल. या विद्यार्थ्यांना प्रशासनाने निश्‍चित केलेल्या शैक्षणिक संस्थेत दोन वर्ष निवासी निःशुल्क प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील.

प्रशिक्षण अभ्यासक्रम अर्धवट सोडता येणार नाही. त्याकरिता विद्यार्थ्याची व पालकांची तयारी, संमती आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी आपले बैठक क्रमांक पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या www.zpnashik.maharashtara.gov.in या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षण विभागात अर्ज करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, डॉ मिता चौधरी यांनी केले आहे.

JEE NEET Exam
Nashik Success Story : JEE Advanced परीक्षेत अभिषेक ने देशात पटकावला 166 वा क्रमांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com