JEE NEET Exam Training : खुशखबर! आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोफत जेईई, नीट प्रशिक्षण...

JEE NEET Exam
JEE NEET Examesakal

JEE NEET Exam Training : नाशिक जिल्हा परिषदेतील सुपर-५० उपक्रमाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांना देखील आता नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने जेईई व नीट परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाने ही योजना आणली असून, राज्यातील चार अपर आयुक्त कार्यालय क्षेत्रातील प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. याकरिता चार कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Free JEE NEET coaching for tribal students by tribal development department nashik news)

आदिवासी विद्यार्थ्यांचा या परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढावा, यासाठी अकरावी व बारावीमध्ये शिकत असतानाचा या विद्यार्थ्यांकरिता अभियांत्रिकी, वैद्यकीय व विधी पदवी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, स्पेशल क्लास रेल्वे ॲप्रेंटिस अभ्यासक्रम, तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय,

वैद्यकीय महाविद्यालय किंवा आय.आय.टी.मधील अभ्यासक्रमांना जास्तीस जास्त मुलांना प्रवेश घेणे शक्य होईल. यासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्ष कालावधीमध्ये नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने मार्गदर्शन करण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JEE NEET Exam
JEE NEET Exam : जेईए, नीटसाठी मोफत कोचिंग; जिल्हा परिषदेतर्फे या तारखेला परीक्षा

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर शासकीय आश्रमशाळा/ अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील कोणत्याही एका शाळेमध्ये एक तुकडी वैद्यकीय व दुसरी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. त्यात अकरावी व बारावी वर्गात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक तुकडीमध्ये ३० मुले व मुली असतील.

यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातील. फक्त प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रतितुकडी (वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम) ११ वी व १२ वी या दोन्ही वर्गांसाठी ४८० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यात ५० टक्के विद्यार्थी हे शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील असतील. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थी एक लाख प्रतिवर्षी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

JEE NEET Exam
Nashik 11th Admission : पहिल्‍या यादीत कट ऑफ खालावला; 11 हजार 953 विद्यार्थ्यांची निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com