Job Opportunity : साडेतीनशे पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job News

Job Opportunity : साडेतीनशे पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला अंशतः मिळालेली मंजुरी व आस्थापना खर्च काही प्रमाणात शिथिल करण्याच्या निर्णयानंतर अग्निशमन विभागाच्या २०८ व वैद्यकीय विभागातील साडेतीनशे पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीनंतर टीसीएस व आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया केली जाणार आहे. (Job Opportunity Open way for recruitment of three half hundred posts Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वैद्यकीय सेवा तसेच तातडीची पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेला भरती करता येणार आहे. महापालिकेत जवळपास तीन हजार रिक्त पदे आहेत. अनेकदा मागणी करूनही रिक्तपदे भरण्यास परवानगी दिली जात नाही, तर जवळपास १४ हजार पदांचा नवीन आकृतिबंधदेखील शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी नाही व आस्थापना खर्च वर गेल्याने पदे भरता येत नाही. कोविडकाळात वैद्यकीय व अग्निशमन या महत्त्वपूर्ण सेवांमधील रिक्तपदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती.

परंतु, सेवा नियमावलीमुळे रिक्तपदे भरता आली नाही. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरोग्य व महत्त्वाच्या सेवांमधील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार अग्निशमन विभागातील २०८ व वैद्यकीय सेवेतील जवळपास साडेतीनशे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेकडूनदेखील टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दिवाळीनंतर या भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.

हेही वाचा: Diwali Padwa 2022 : दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!