Nashik News : मुद्रणालयातील मृत कामगारांच्या वारसांना नोकरी

Jobs for heirs of deceased press workers nashik news
Jobs for heirs of deceased press workers nashik news esakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील मयत कामगारांच्या वारसांना पुन्हा एकदा नोकरी मिळाली आहे. यंदा २१ वारसांना योजनेचा लाभ झाला आहे.

बंद असलेली मयत कामगार भरती इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने ४ फेब्रुवारी २०१३ ला सुरू केल्यापासून आजपर्यंत भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील ७६ मयत कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याचे काम मजदूर संघाने केल्याची माहिती सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. (Jobs for heirs of deceased press workers nashik news)

नवीन मनुष्यबळ निकषानुसार डब्लू वन ग्रेडच्या पाच टक्के जागा भरण्याची पध्दत कशी चुकीची आहे, हे मजदूर संघ नेत्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाबरोबर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले आहे. नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (मनुष्यबळ) प्रकाश कुमार यांच्या सहीचे भरतीचे पत्र मजदूर संघाला नुकतेच प्राप्त झाले.

त्यामुळे २१ मयत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मजदूर संघाच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Jobs for heirs of deceased press workers nashik news
Nashik News : अखेर 342 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर; अमृत-२ अभियानांतर्गत निधी

मंजुरीमुळे आतापर्यंत एकूण ७६ वारसांना प्रेसमध्ये नोकरी देण्याचे काम मजदूर संघाने केले आहे. उर्वरित वारसांसाठीही मार्ग निघावा यासाठी मजदूर संघाचे प्रयत्न सुरू आहे. वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तर तोही करणार असल्याची माहिती जगदीश गोडसे यांनी दिली.

दरम्यान, या वारसांतर्फे जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, राजू जगताप, अशोक पेखळे, संतोष कटाळे, अविनाश देवरूखकर, इरफान शेख, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, अण्णा सोनवणे, बबन सैद, मनोज सोनवणे, मनीष कोकाटे, दशरथ बोराडे, भूषण मेढे, सतीश चंद्रमोरे, दत्ता गांगुर्डे, सुनील नाईक, योगेश कुलवदे, बाळासाहेब ढेरिंगे, सुधीर पगारे, कैलास मुठाळ, कचरू ताजनपुरे, गणेश काळे, सचिन दिवटे, संतोष कुलथे, संजय गरकळ आदी उपस्थित होते.

Jobs for heirs of deceased press workers nashik news
Nashik News : हप्ता न दिल्याने गरीब वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल पेटविला; जेल रोड येथील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com