Marathi Journalists Day : उद्या पत्रकारांचा गौरव; ‘सकाळ’चे प्रशांत कोतकर यांचा पुरस्कारर्थींमध्ये समावेश

मराठी पत्रकार दिन : महसूलमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या पत्रकारांचा गौरव
Revenue Minister Vikhe Patil
Revenue Minister Vikhe Patilesakal

Marathi Journalists Day : जागतिक मराठी पत्रकार दिनानिमित्त सोमवारी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

नाशिक शहर पत्रकार संघातर्फे दर वर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारीला प्रकाशित वर्तमानपत्राच्या स्मरणार्थ जागतिक मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (Journalists will be honored tomorrow in presence of Revenue Minister Vikhe Patil in nashik news )

यानिमित्त मावळत्या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या, तसेच विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या पत्रकारांचा गौरव केला जातो. यंदाचा पत्रकार गौरव समारंभ सोमवारी (ता. ८) दुपारी तीनला मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

कृषिमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. या वेळी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ प्रमुख पाहुणे असतील.

Revenue Minister Vikhe Patil
Journalist Day : पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन करणारे गोपाळराव जोशी

या वेळी उपवृत्त संपादक प्रशांत कोतकर (सकाळ), अनिल पवार (महाराष्ट्र टाइम्स), सुयोग जोशी (लोकमत), संजय भड (दिव्य मराठी), नीलेश अलई (नवराष्ट्र), सोमनाथ ताकवाले (देशदूत), अतुल भांबेरे (पुण्यनगरी), वैभव कातकाडे (पुढारी), गोरख काळे (गावकरी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुशांत किरवे (आपलं महानगर), प्रशांत निरंतर (भ्रमर) आणि नीलेश तांबे (छायाचित्रकार) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

उपस्थितीचे आवाहन मुद्रित माध्यम संस्थांचे सर्व संपादक आणि नाशिक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे आणि कार्यकारी समितीचे सदस्य हेमंत भोसले, श्याम बागूल, संजय पाठक, विनोद पाटील, आसिफ सय्यद, ज्ञानेश्वर वाघ, नीलेश अमृतकर, रवींद्र केडिया यांनी केले आहे.

Revenue Minister Vikhe Patil
Marathi Journalists Day: नाशिक पोलीस आयुक्त संघाची पत्रकार संघावर मात; पत्रकार दिनानिमित्ताने क्रिकेट सामना उत्साहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com