Marathi Journalists Day: नाशिक पोलीस आयुक्त संघाची पत्रकार संघावर मात; पत्रकार दिनानिमित्ताने क्रिकेट सामना उत्साहात

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार दिनानिमित्ताने पोलीस आयुक्तालय क्रिकेट संघ व पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात क्रिकेट सामन्याचे आयोजन शनिवारी (ता.६) सकाळी करण्यात आले होते.
Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police Commissioner Sandeep Karnikesakal

नाशिक : पत्रकार दिनानिमित्ताने शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस आयुक्त संघाने पत्रकार संघावर पाच गडी राखून विजय मिळविला.

पत्रकार संघाने निर्धारित षटकांमध्ये ८० धावा केल्या होत्या. (Nashik Police Commissioners Union defeats Journalists Union Cricket match in excitement on occasion Marathi Journalists Day)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार दिनानिमित्ताने पोलीस आयुक्तालय क्रिकेट संघ व पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात क्रिकेट सामन्याचे आयोजन शनिवारी (ता.६) सकाळी करण्यात आले होते.

प्रथम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मैदानावर हजेरी लावत हाती बॅट घेतली आणि दोन चेंडूंना टोलावत स्पर्धेचे उद्‌घाटन केले.

त्यानंतर आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. पोलीस आयुक्त संघाचे कर्णधार व गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाना निर्णय घेतला.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Journalist Day : पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन करणारे गोपाळराव जोशी

पत्रकार संघात इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंन्ट मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. तर संदेश केदारे कर्णधार होते. इम्रान शेख, किरण ताजणे यांनी संघाला जोरदार सुरवात करून दिली. त्यानंतर संदेश केदारे यांनी सर्वाधिक २९ धावांचे योगदान देत जोरदार फटकेबाजी केली.

निर्धारित ८ षटकांमध्ये पत्रकार संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा केल्या. प्रत्युत्तरात पोलीस आयुक्त संघाकडून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी जोरदार फटकेबाजी केल्याने संघाला विजयाच्या समीप नेले.

अखेरीस पाच गडी राखून पोलीस आयुक्त संघ विजयी झाला. कर्णधार प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण हे नाबाद राहिले. यावेळी पंच म्हणून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच विशाल लहाने, विक्रांत उदावंत यांनी कामगिरी पार पाडली

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Journalist Day Special; कनकाडीत मिळाली १४५ वर्षांपूर्वीची ‘जगन्मित्र’, ‘सत्यशोधक’ वृत्तपत्रे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com