कृषी तंत्रनिकेतन, तंत्र विद्यालय प्रवेशासाठी 22 जुलैची मुदत | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission latest marathi news

कृषी तंत्रनिकेतन, तंत्र विद्यालय प्रवेशासाठी 22 जुलैची मुदत

मालेगाव (जि. नाशिक) : येथील कृषी तंत्रनिकेतन अथवा कृषी तंत्र विद्यालयासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Admission process) सुरु झाली आहे. २०२२- २३ या वर्षासाठी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे.

प्रवेशासाठी माहिती पुस्तक व अर्ज www.mpkvdiplomaadmission.com किंवा www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जुलैपर्यंत आहे. ही माहिती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मालेगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (July 22 deadline for admission to Krishi Tantra Niketan Tantra Vidyalaya nashik Latest Marathi News)

पत्रकात म्हटले आहे की, कृषी पदविका, तंत्रनिकेतन आणि पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी किंवा पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, कृषी तंत्रनिकेतन व कृषी तंत्रविद्यालयांमध्ये तसेच शेती विषयात माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कृषी विषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून संधी मिळू शकते.

त्याचबरोबर कृषी विद्यापीठांमध्ये कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ, विस्तार विभागात विषय विशेषज्ज्ञ, राज्य सरकारच्या कृषी विभागात कृषी सहाय्यक या पदावर काम करण्यास संधी मिळू शकते.

तसेच, कृषी पदवीधर हे भारतीय कृषी अनुसंधान परीषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदावर कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक या पदावर काम करण्यास संधी उपलब्ध आहे.

हेही वाचा: नाशिक रोड भागात उद्या पाणीपुरवठा बंद

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बँकामध्ये कृषी अधिकारी नेमणूक होऊ शकते. विविध कृषी संलग्न खते, बी बियाणे, किटकनाशके आदी कंपन्यांबरोबरच यंत्र अवजारे कंपनी व प्रक्रिया उद्योगांमध्ये संधी मिळू शकते.

कृषी सेवा केंद्र रोपवाटीका, फळप्रक्रिया, कुक्कुटपालन, पशुधन व्यवसाय, शेळीपालन, गांडुळखत निर्मिती व विक्री, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, लाख उत्पादन प्रकल्प, जैविक किटकनाशके व खते उत्पादन प्रकल्प आदी व्यवसाय सुरू करू शकतात.

पदवीधर स्वतः चे कृषी सल्ला केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करु शकतात. तसेच, स्वतःची व कंत्राटी पद्धतीने शेती भाडेतत्वावर घेवून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केल्याने आदर्श शाश्‍वत व सेंद्रिय शेती करू शकतात.

त्यानुसार इतर शाखेतील सुशिक्षित व बरोजगारांना विविध रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन प्रवेश अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा: वडगाव सिन्नर येथे देवनदी पात्रात बिबट्याचा मृतदेह

Web Title: July 22 Deadline For Admission To Krishi Tantra Niketan Tantra Vidyalaya Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..