NAAC: ‘नॅक’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 5 जूनची डेडलाइन; प्रक्रिया पूर्ण न केलेल्‍या महाविद्यालयांना सूचना

NAAC
NAACesakal

NAAC : ‘नॅक’ मूल्‍यांकन, पुनर्मूल्‍यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सूचना जारी केली होती. तरीदेखील प्रक्रिया पूर्ण न केलेल्‍या महाविद्यालयांना पूर्ततेसाठी मुदत दिली आहे.

त्‍यानुसार ‘नॅक’संदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५ जूनपर्यंत डेडलाइन दिली आहे. या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांना प्रथम वर्ष प्रवेशावर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये निर्बंध आणले जाणार आहेत. (June 5 deadline to complete NAAC process instruction to college not completed procedure nashik news)

पुणे विद्यापीठातर्फे नुकतेच पत्र जारी करताना महाविद्यालयांना सूचना केली आहे. विद्यापीठाशी संलग्‍न असलेल्‍या सर्व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित पारंपरिक महाविद्यालये, व्‍यावसायिक महाविद्यालये, मान्‍यताप्राप्त परिसंस्‍था यांच्‍यासाठी ही सूचना जारी केली आहे.

त्‍यानुसार महाविद्यालयांनी नॅक मूल्‍यांकन, पूनर्मूल्‍यांकन प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यापूर्वीच आदेश जारी केले होते. शिक्षण संचालक कार्यालयाकडून पत्र जारी करताना मूल्‍यांकन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्‍या होत्या.

यापूर्वी नॅक मूल्‍यांकन, पुनर्मूल्‍यांकन प्रक्रिया प्रारंभ टप्प्‍यातील संस्‍था नोंदणी करून इन्‍स्‍टिट्यूशनल इन्‍फॉर्मेशन फॉर क्‍वालिटी असेसमेंट (आयआयक्‍यूए) नॅक कार्यालयास ३१ मार्चपर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NAAC
Sharad Ponkshe : स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती पण...; अभिनेते शरद पोंक्षे

मात्र अद्यापपर्यंत नॅक मूल्‍यांकन, पुनर्मूल्‍यांकन पूर्ण केलेले नसलेल्‍या महाविद्यालयांनी प्रारंभीच्‍या टप्‍यातील ‘आयआयक्‍यूए’ हे ‘नॅक’ कार्यालयास सादर केलेले नाही, अशा महाविद्यालयांना आता ५ जूनपर्यंत मुदत दिली आहे.

ही माहिती ‘नॅक’ला सादर केल्‍याबाबतची माहिती विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरील कॉलेज प्रोफाइलमध्ये अद्ययावत करण्यास सांगितले आहे. असे न झाल्‍यास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता संबंधित महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्‍थांना मंजूर असलेल्‍या सर्व अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षासाठी प्रवेशास निर्बंध लागू करण्यात येतील, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

प्रवेश क्षमता होणार प्रभावित

बारावीचा निकाल जाहीर झाला असून, आता विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशाची लगबग लवकरच सुरू होणार आहे.

अशात ‘नॅक’ प्रक्रिया पूर्ण न केलेल्‍या महाविद्यालयांतील प्रवेशावर निर्बंध घातले जाणार आहेत. यामुळे प्रवेश क्षमता प्रभावित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

NAAC
NMC Recruitment : राज्य शासनाने आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com