वृत्तांकन करणार्‍या पत्रकारावर मालेगावात जमावाचा हल्ला

दोन गटांत सुरू असलेल्या हाणामारीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे ते वार्तांकन करत होते.
Crime
Crimeesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सटाणा रस्त्यावरील वॉलफोर्ट संकुलासमोर दोन गटांत सुरू असलेल्या हाणामारीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे वार्तांकन करणारे येथील मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर जमावाने हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याला व पाठीला जखम झाली. गुरुवारी (ता. १६) दुपारी हा प्रकार घडला.

येथील सुखकर्ता हॉस्पिटलचे संचालक डाॅ. किरण पाटील व त्यांच्या पत्नी डाॅ. वेलंतिना पाटील यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. गुरुवारी दुपारी डॉ. पाटील हॉस्पिटलचा ताबा घेण्यासाठी खासगी सुरक्षारक्षकांसह दाखल झाले. या वेळी उभय गटात वाद झाला. त्याचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले. यामुळे येथे मोठा जमाव जमला. जमावाने खासगी सुरक्षारक्षकांना मारहाण केली. या वादात वैद्य हाॅस्पिटलजवळील सटाणा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. श्री. वाघ घटनेचे वृत्त संकलनासाठी मोबाईलमध्ये वाहतूक कोंडी व हाणामारीचे दृश्य टीपत होते. त्याचा राग आल्याने विकी पाटील व पप्पू कासवे यांच्यासह १५ ते २० अनोळखी तरुणांनी वाघ यांच्यावर हल्ला चढवला. मारहाणीचे छायाचित्र नष्ट करण्यासाठी दमदाटी करत काहीकाळ त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. यात वाघ यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. पाठीवर व मानेवर मुका मार लागला.

Crime
शेतकऱ्यांनो फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध रहा

याप्रकरणी वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विकी पाटील व पप्पू कासवे याच्यासह १५ ते २० अनोळखी तरुणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव तपास करीत आहेत. मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, संशयितांवर कारवाईची मागणी केली आहे.

Crime
घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक; 14 गुन्ह्यांची उकल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com