Water Supply
sakal
सिन्नर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा योजनेच्या रोहित्रात बिघाड झाल्याने चार दिवसांपासून योजना ठप्प झाली आहे. रोहित्र दुरुस्तीसाठी अजून किमान आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही धावपळ सुरू आहे. तथापि, ऐन दिवाळीत पाणीयोजना ठप्प पडल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.