Uddhav Thackeray Nashik Visit: काळाराम मंदिर भाविकांसाठी अर्धातास बंद उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजेपूर्वीचे नियोजन

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सोमवारी (ता.२२) सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा होणार.
Uddhav Thackeray (file photo)
Uddhav Thackeray (file photo)esakal

Uddhav Thackeray Nashik Visit : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सोमवारी (ता.२२) सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. मात्र, सध्या भाविकांची गर्दी असल्याने सायंकाळी महापूजेपूर्वीच अर्धा तास भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. तसेच, परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही असणार आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी श्री काळाराम मंदिरात पाहणी करीत पोलिसांना सूचना केल्या. (Kalaram temple closed for half an hour for devotees Planning before Mahapuja by Uddhav Thackeray nashik news)

माजी मुख्यमंत्री व शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी येत आहेत.

सोमवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता ठाकरे यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात महापूजा आणि त्यानंतर गोदाघाटावर जाऊन गोदावरीची महाआरती होणार आहे.

या नियोजनानुसार, खासदार संजय राऊत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.२१) सायंकाळी श्री काळाराम मंदिरात पाहणी केली.

Uddhav Thackeray (file photo)
Nashik MNS News : ‘मनसे’कडून 51 हजार बुंदी लाडूंची मेजवानी! तयारी रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापनाची

यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग व गर्दी होती. त्यामुळे सोमवारी (ता.२२) देखील मोठ्या संख्येने गर्दी असण्याची शक्यता आहे. महापूजा सुरू होण्यापूर्वीच मंदिरात भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे.

महापूजा आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे साधारणत: अर्धा ते पाऊस तास मंदिरात भाविकांना प्रवेश बंद राहण्याची शक्यता आहे. तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त नितीन जाधव व पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे आदी उपस्थित होते.

Uddhav Thackeray (file photo)
Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाअधिवेशन; आज गोदा आरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com