Student Death
sakal
अभोणा: कळवण तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांवरील घोटाळे आणि निष्काळजीपणाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या तिसरीतील रोहित विलास बागूल (वय १०, रा. सरले दिगर) या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सर्वांत धक्कादायक म्हणजे, त्याचा मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावरच पडून राहिला. या अमानवी घटनेने परिसरात संताप आणि शोककळा पसरली आहे.