Kalwan News : कळवणमध्ये अपहरण नाटकाचा पर्दाफाश! बेपत्ता विठोबा पवार अवघ्या २४ तासांत घरातच सापडला; सूत्राधार कोण?
Missing person Vitthal Pawar located safe in Kalwan : कळवण खुर्द येथून बेपत्ता झाल्याचा आणि कथित अपहरणाचा आरोप असलेले शेतमजूर विठोबा गुलाब पवार यांना कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत त्यांच्या राहत्या घरात शोधून काढले. या घटनेनंतर कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
कळवण: कळवण खुर्द येथून बेपत्ता झालेल्या व कथित अपहरणाची चर्चा असलेले शेतमजूर विठोबा गुलाब पवार यांना अवघ्या २४ तासांत शोधण्याचे आंदोलकांना दिलेले आश्वासन कळवण पोलिसांनी पूर्ण केले.