कांदळवन प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय छायाचित्र पुरस्कार आनंद बोरांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद बोरांना
कांदळवन प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय छायाचित्र पुरस्कार आनंद बोरांना प्रदान

कांदळवन प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय छायाचित्र पुरस्कार आनंद बोरांना प्रदान

नाशिक : महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा झाली. या स्पर्धेत ‘सकाळ’चे बातमीदार आनंद बोरा यांना मानव आणि पक्षी गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५ ते १३ नोव्हेंबरला पक्षी सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त प्रतिष्ठानतर्फे ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेचा विषय ‘महाराष्ट्रातील किनारी आणि पाणथळ पक्षी’ असा होता. पोर्ट्रेट, वर्तन, मानव व पक्षी आणि निसर्गातील सौंदर्य अशा चार श्रेणी स्पर्धेसाठी निश्‍चित केल्या होत्या. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संवर्धन कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी विषय तज्ज्ञांची नेमणुकीसाठी आणि विविध उपक्रमांमध्ये लवचिकता आणण्यासाठी प्रतिष्ठानची निर्मिती राज्य सरकारने केली आहे.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेते आनंद बोरा यांचे छायाचित्र

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेते आनंद बोरा यांचे छायाचित्र

हेही वाचा: अकोला : कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

किनारी आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण, संशोधन आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठान सक्रिय भूमिका बजावत आहे. किनारी जैवविविधतेबरोबर कांदळवनांचे संवर्धन आणि देखरेखीचे कार्य प्रतिष्ठान करते. भगतांना उल्लेखनीय पारितोषिक छायाचित्र स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. निसर्गातील सौंदर्य श्रेणीत डॉ. पराग नलावडे, पोर्ट्रेट श्रेणीत निखिल जांभळे यांना पारितोषिक मिळाले. वर्तन श्रेणीत दोन पारितोषिके दिली गेली. त्यातील प्रथम पारितोषिक संतोष गुळवणी यांना, तर द्वितीय पारितोषिक प्रणव गोखले यांना देण्यात आले. एक विशेष उल्लेख पारितोषिक देण्यात आले. त्याचे मानकरी अविनाश भगत ठरले.

लाकडे गोळा करणाऱ्या महिला अन वारकरी महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात वारकरी पक्षी आणि लाकडे गोळा करणाऱ्या महिला असे छायाचित्र आनंद बोरा यांनी टिपले होते. या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनचे क्षमता उभारणी अधिकारी हृषिकेश राणे यांनी आभार मानले.

loading image
go to top