नाशिक : कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा

युवक राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे नाशिक पोलिसांना निवेदन
कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा
कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हाsakal
Updated on

नाशिक : कंगना राणावत यांनी ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केल्याने त्यांच्या विरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना दिले.

सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी खैरे यांना सांगितले.

कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा
प्रशिक्षणावेळी चंद्रकांत कुंभार यांनी बनविलेला सहा फुटी फ्लाॅवर पाॅट

कंगना राणोत या हिंदी चित्रपट सृष्टीतील नामांकित अभिनेत्री आहेत, त्यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कामगिरीबद्दल नुकतेच पद्मश्री या बहुमानाने गौरविण्यात आले, या गौरवानंतर त्यांनी एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी "देशाला पूर्वी मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती,देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ रोजी मिळाले." अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे, राणोत यांच्या या वक्तव्यामुळे देशाचा, देशातील प्रत्येक नागरिकाचा आणि त्याहून महत्वाचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हजारो स्वातंत्र्यसेनानींचा अपमान झाला झाले, या स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी दिलेले बलिदान राणोत यांच्या एका वक्तव्यामुळे कवडीमोल ठरले आहे, देशाचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न राणोत यांनी या वक्तव्यातून केला आहे.

त्यामुळे कंगना राणोत यांच्यावर १५३(अ) तसेच देशद्रोहासाठी अन्य जी योग्य कलमे असतील, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे व शिष्टमंडळाने दिले. सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी खैरे यांना सांगितले.

कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा
नागपूर : बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या

याप्रसंगी बाळा निगळ, जय कोतवाल, संतोष जगताप, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, रामदास मेदगे, डॉ. संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष गोवर्धने, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, गणेश गरगटे, भालचंद्र भुजबळ, रोहित जाधव, अमर गोसावी, अमनदीप रंधावा, बजरंग गोडसे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com