नाशिक : पोलिस उपनिरीक्षपदी ‘ती’चा करिष्मा!

Karisma Sonawane from Satana Succeed in MPSC Exam
Karisma Sonawane from Satana Succeed in MPSC Examesakal

विरगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सटाणा येथील एकुलती कृषिकन्या करिष्मा सोनवणे हिने पोलिस उपनिरीक्षकपदी (PSI) इतर मागास प्रवर्गात (OBC) राज्यात ७ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले. जिद्द, मेहनत, चिकाटी, नियमित अभ्यास, वाचन- मनन आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर तिने पोलिस उपनिरीक्षकपदावर करिष्मा दाखविला.

सटाणा येथील सोनवणे परिवाराचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, एकत्र कुटुंबपद्धती असल्याने मुलांवर चांगले संस्कार झाले. करिष्माचे आजोबा दिवंगत सुकदेव पाटील हे सटाणा शहराचे पोलिस पाटील असल्याने पोलिस खात्याविषयी पंचक्रोशीत त्यांचा चांगला नावलौकिक होता. करिष्माचे प्राथमिक शिक्षण सटाणा येथील माणिबाई अग्रवाल प्राथमिक शाळेत शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कुल येथे पूर्ण केल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सटाणा येथील कर्मवीर नारायण मन्साराम सोनवणे महाविद्यालयात पूर्ण केले. अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झाल्यानंतर करिष्माने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळवला.

Karisma Sonawane from Satana Succeed in MPSC Exam
नाशिक : गोठे, तबेल्यांचे परवाना नूतनीकरण बंधनकारक

पुणे येथील युनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासाला सुरवात केली. राज्याचे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपणही समाजासाठी काहीतरी करु शकतो, या भावनेतून त्यांनी आजोबांच्या पोलिस पाटील खात्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे पोलिस खात्यात नोकरी करण्याचे ध्येय निश्‍चित केले. वडील बाबाजी सोनवणे, काका वसंत सोनवणे यांनी प्रोत्साहन दिल्याने उभारी मिळाल्याचे करिष्मा अभिमानाने सांगते.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी करिष्माने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. २०१८ मध्ये अभियांत्रिकीच्या पूर्व परीक्षेत एका मार्काने तिला मुख्य परीक्षा देता आली नाही. त्यानंतर २०१९ मध्ये अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर २०१९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा त्यांनी दिली. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव व मराठा आरक्षणाचा तिढा यामुळे दोन ते अडीच वर्षे त्यांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र, पोलिस खात्याविषयी आकर्षण त्यांचे कधीच कमी झाले नाही. त्यानंतरही त्यांनी पुढील परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यांना या खात्यातील या पुढील परीक्षा देऊन मोठ्या पदावर नोकरी करून समाजकार्य करण्याची इच्छा आहे.

Karisma Sonawane from Satana Succeed in MPSC Exam
महापालिका प्रशासक काळात अधिकाऱ्यांच्या मुजोरीला नाशिककर त्रस्त

"ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेसाठी फारसे मार्गदर्शन मिळत नाही. मात्र, परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन अभ्यासाची तयारी केली की आपण ग्रामीण भागात राहतो की शहरात याचा काही परिणाम होत नाही. शिवाय कुटुंबियांचे सहकार्य व प्रोत्साहान मोलाचे ठरते. स्वअध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळू शकते."

- करिष्मा सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com