Uttam Kamble : ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळेंना कनार्टक सरकारतर्फे पुरस्‍कार जाहीर

साहित्‍य, कला, संस्‍कृती या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणार्या व्‍यक्‍तींना कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी पुरस्‍काराने सन्‍मानित केले जात असते.
Uttam Kamble
Uttam Kambleesakal

नाशिक : साहित्‍य, कला, संस्‍कृती या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणार्या व्‍यक्‍तींना कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी पुरस्‍काराने सन्‍मानित केले जात असते.

कर्नाटकातील असलेल्‍या व राज्‍याबाहेर राहून कर्तृत्त्व गाजविणार्या व्‍यक्‍तींची यावर्षी प्रथमच पुरस्‍कारासाठी निवड केली आहे. (Karnataka Govt Announces Award to Senior Literary Uttam Kamble on 31 january nashik news)

पुरस्‍कारार्थींच्‍या नावाची घोषणा कर्नाटक सरकारने केली असून, पुरस्‍कारार्थींमध्ये ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळे यांचा समावेश आहे. येत्‍या ३१ जानेवारीला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्‍या हस्‍ते पाच लाख रुपये, स्‍मृतिचिन्‍ह व सन्‍मानपत्र अशा स्‍वरुपात पुरस्‍कार प्रदान केला जाणार आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध दलित कवि सिद्धलिंगैय्या यांच्‍या नावाने दिला जाणारा पुरस्‍कार श्री. कांबळे यांना जाहीर झाला आहे. बंगळुरु (कर्नाटक) येथील रविंद्र कलाग्राम येथे येत्‍या ३१ जानेवारीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कारार्थींना पुरस्‍कारांचे वितरण केले जाणार आहे.

ज्‍येष्ठ साहित्‍यिक व अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्‍या अनेक कथा, कादंबर्या, कविता आणि आत्‍मकथन आदी एकूण १८ कलाकृतींचा कन्नड भाषेमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. कर्नाटक राज्‍यातील विविध विद्यापीठे तसेच शालेय स्‍तरावरील अभ्यासक्रासाठी या साहित्‍यकृतींचा समावेश केलेला आहे.

Uttam Kamble
Nashik MVP Marathon : रविवारी नाशिक मविप्र मॅरेथॉन; नाशिककरांना सहभागाचे आवाहन

कन्नडमध्ये गाजलेल्‍या साहित्‍यकृती अशा-

उत्तम कांबळे यांचे आत्‍मकथन 'आई समजून घेताना'च्या कन्नड भाषेतील सुमारे दहा आवृत्त्या कन्नड भाषेतून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. याशिवाय 'रंग माणसांचे', 'कावळे आणि माणसं', 'श्राद्ध' या कथासंग्रहाचे तसेच 'गजाआडच्‍या कविता' या कवितासंग्रहाचे आणि

'कुंभमेळा साधुंचा की संधीसाधुंचा', 'बुद्धाचा रहाट' या कादंबरीचा कन्नड भाषेमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. व 'मिरवणूक' या कन्नड भाषेतील कादंबरीचे लवकरच प्रकाशन केले जाणार आहे.

Uttam Kamble
Uttam Kamble : कोल्हापुरात RPI ला मिळणार बळ, जिल्हाध्यक्षपदी उत्तम कांबळेंची निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com