Kasara Ghat
sakal
इगतपुरी: सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखंडपणे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, त्यासोबत असणारे दाट धुके व वेगाने वाहणारे वारे, पावसामुळे संपूर्ण तालुक्यात पसरलेला हिरवागार गालिचा, हिरवाईने नटलेले डोंगर, ढगांच्या दुलईत शिरलेली शिखरे व कडेकपारीतून वाहत येणाऱ्या निर्झराचे उंचावरून पडणारे धबधबे असे मनमोहक चित्र सध्या इगतपुरीसह कसारा घाट व परिसरात दिसत असून, निसर्गाने बहरलेले रेल्वेचे बोगदे वळणावळणांचा कसारा घाट व भारतीय मध्य रेल्वेचा ब्रिटिशकालीन हिवाळी पूल पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.