Rail Line
sakal
नाशिक: कसारा ते मनमाडदरम्यान १३१ किलोमीटरचा समांतर रेल्वेमार्ग उभारण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. प्रकल्पासाठी अंदाजे साडेचार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ४४ गावांमध्ये भू-संपादन केले जाणार आहे. नवीन रेल्वेमार्गामुळे मुंबई ते नाशिक रोड रेल्वे प्रवास अधिक गतिमान होतानाच या दोन शहरांमधील लोकलसेवेचा मार्गही खुला होईल.