esakal | नाशिकमध्ये शंभर टक्के लसीकरणासाठी ‘कवच-कुंडल’ मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

नाशिकमध्ये शंभर टक्के लसीकरणासाठी ‘कवच-कुंडल’ मोहीम

sakal_logo
By
विनोद बेदरकर -सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणासाठी शुक्रवार पासून शहरी व ग्रामीण मिशन ‘कवच-कुंडल’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम आठवडाभर राबविण्यात येणार असून, त्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिक (Nashik) , मालेगाव (Malegaon) महापालिकेसह सर्व शहरी, ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार १८ वर्षांवरील सर्वांना पहिला डोस व दुसरा डोस देऊन १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

गावोगावी दवंडी अन्‌ जनजागृती

लसीकरणापूर्वी गावोगावी दवंडी, विद्यार्थ्यांच्या रॅली व ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५९२ उपकेंद्रे, सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्रे, कटक मंडळ दवाखान्यात कवच-कुंडल मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आशासेविका, आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: मुंबई, ठाण्यातील ५० रुग्णालये पेपरलेस

महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, १५ तालुक्यांतील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकासाधिकारी, तालुका आरोग्याधिकारी मोहिमेचे संनियंत्रण करणार आहेत. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर १८ वर्षे पुढील सर्व वयोगटांचे दुसऱ्या डोससह १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

loading image
go to top