Nashik News : ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळेंना कवी सिद्धलिंगय्या पुरस्कार प्रदान

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्‍येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना नुकताच झालेल्‍या समारंभात प्रतिष्ठेच्या कवी सिद्धलिंगय्या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले.
Kavi Siddalingaiah Award given to Senior Literary Uttam Kamble nashik news
Kavi Siddalingaiah Award given to Senior Literary Uttam Kamble nashik news
Updated on

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्‍येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना नुकताच झालेल्‍या समारंभात प्रतिष्ठेच्या कवी सिद्धलिंगय्या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले.

कर्नाटक शासनातर्फे हा पुरस्‍कार त्‍यांना प्रदान करण्यात आला आहे. मानपत्र, स्‍मृतिचिन्‍ह व पाच लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते. (Kavi Siddalingaiah Award given to Senior Literary Uttam Kamble nashik news)

सिद्धलिंगय्या हे क्रांतिकारी दलित कवी होते. २०२१ मध्ये त्यांच्या निधनानंतर कर्नाटक शासनाने त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. कर्नाटकातील असलेल्‍या व राज्‍याबाहेर राहून कर्तृत्व गाजविणाऱ्या व्‍यक्‍तींना यावर्षी विविध गटांतून पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले. या पुरस्‍कारार्थींमध्ये उत्तम कांबळे यांचा समावेश होता. बंगळुरू (कर्नाटक) येथील रवींद्र कलाग्राम येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कारांचे वितरण करण्यात आले.

Kavi Siddalingaiah Award given to Senior Literary Uttam Kamble nashik news
Nashik News : कुटुंबियांच्याच नावे काढली; `रोहयो’ची लाखोंची बिले

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या उत्तम कांबळे यांच्‍या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता आणि आत्‍मकथन आदी एकूण १८ साहित्यकृतींचा कन्नडमध्ये अनुवाद केलेला आहे. तसेच, कर्नाटकातील विविध विद्यापीठे तसेच शालेय अभ्यासक्रमांमध्ये या साहित्‍यकृतींचा समावेश केलेला आहे.

त्‍यांचे आत्‍मकथन ‘आई समजून घेताना’च्या कन्नडमध्ये दहा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्‍या आहेत. याशिवाय, ‘रंग माणसांचे’, ‘कावळे आणि माणसं’, ‘श्राद्ध’ या कथासंग्रहांचे तसेच ‘गजाआडच्‍या कविता’ या कवितासंग्रहाचे आणि ‘कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा’, ‘बुद्धाचा रहाट’ या कादंबऱ्यांचा कन्नड भाषेत अनुवाद करण्यात आलेला आहे. ‘मिरवणूक’ ही कन्नड कादंबरीही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

Kavi Siddalingaiah Award given to Senior Literary Uttam Kamble nashik news
Nashik News: गोदावरी महाआरतीत वाढावा नाशिककरांचा सहभाग! गंगा गोदावरी पुरोहित संघ- रामतीर्थ सेवा समितीत वाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Judge Under Fire After Chamber Relationship With Senior Police Officer Comes to Light
Fatal Accident: Senior MSEDCL Technician Electrocuted While Repairing High-Tension Wire in Giravali
Belagavi doctor end life due to cancer pain
OpenAI AI Jobs, Senior Machine Learning Engineer,
Marathi News Esakal
www.esakal.com