Nashik News : कुटुंबियांच्याच नावे काढली; `रोहयो’ची लाखोंची बिले

ग्रामरोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामांची स्वत:च्या कुटुंबियांच्याच नावे लाखो रूपयांची बिले काढल्याची तक्रार संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
Rohyo bill worth lakhs were drawn by  names of families themselves nashik news
Rohyo bill worth lakhs were drawn by names of families themselves nashik newssakal

Nashik News : आमोदे (ता.नांदगाव) ग्रामरोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामांची स्वत:च्या कुटुंबियांच्याच नावे लाखो रूपयांची बिले काढल्याची तक्रार संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

उपसरपंच भूषण पगार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पगार, रघुनाथ सोनवणे, मायाबाई दळवी, योगिता पगार यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्याकडे तक्रार केली. (Rohyo bill worth lakhs were drawn by names of families themselves nashik news)

त्यानुसार ग्रामपंचायतीने रोहयोच्या माध्यमातून हनुमाननगर (धनगरवस्ती) तीन हजार वृक्षांची लागवड केल्याचे भासवत खोटी बिले सादर केली. प्रत्यक्षात जागेवर तीनशे वृक्षांचीच लागवड करण्यात आली. आदिवासी दफनभूमीत एक हजार वृक्षांची लागवड दाखवत बिले काढली.

जागेवर मात्र शंभरच वृक्ष जिवंत आहेत. आदिवासी महिलांनी या कामाचाी मागणी केली होती. मात्र त्यांना काम न देता दुसऱ्यांना काम दिले आहे. वृक्षारोपणासह खोदकामांच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

Rohyo bill worth lakhs were drawn by  names of families themselves nashik news
Nashik News : नाशिकमध्ये ‘महासंस्कृती महोत्सव’! प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 कोटींच्या खर्चास मान्यता

यात ग्रामरोजगार सेवकाने त्यांच्या आई, बहीण, भावजय, भाऊ, चुलत बहीण, चुलत भाऊ, सासू - सासरे, पुतणे अशा सर्वांच्याच नावाने रोजगार हमी योजनेची बिले काढली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी अशी तक्रार केली आहे.

श्रीमती फडोळ यांनी सदस्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत नरेगाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेकडून चौकशी करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

Rohyo bill worth lakhs were drawn by  names of families themselves nashik news
Nashik News : सिडकोतील अनेक भागात पाण्याचा अपव्यय! पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com