दोन कॉलम
--------------
16242
मालेगाव शहर : येथील केशव वाचनालयात कट्यावर चर्चासत्रात सहभागी रसिक वाचक.
-----
केशव ‘वाचक कट्ट्यावर’
रंगली गाणी, भजनांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. १७ : येथील सटाणा नाका परिसरातील केशव सार्वजनिक वाचनालय व केशव वाचक कट्ट्याच्या वतीने ‘आपले आवडते गाणे, भजन आणि प्रार्थना’ या विषयावर रंगतदार चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत सहभागी वाचक-रसिकांनी आपल्या आवडत्या गीतांचा, भजनांचा व प्रार्थनांचा परिचय करून देत त्यामागील भावना, विचार आणि आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षस्थानी केशव वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र जहागीरदार होते. यावेळी डॉ. योगेश शास्त्री यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण व ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या कार्याची माहिती दिली. या चर्चासत्रात ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा’, ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’, ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’, ‘मेरे दिल ने तडपते जब तेरा नाम पुकारा’, ‘मेरे देश की धरती सोना उगले’, ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, यासह विविध चित्रपटगीते, कविता, प्रार्थना आणि भजनांचा उल्लेख करण्यात आला. प्रत्येकाने आपले आवडते गीत किंवा भजन निवडण्यामागील कारण सांगत त्यातील भावार्थ, जीवनमूल्ये आणि वैयक्तिक आठवणी मांडल्या.
या चर्चेत संजय पाठक, सतीश कलंत्री, डॉ. सुरेश शास्त्री, स्नेहा शास्त्री, आशिष बोहाडे, रवींद्र महाजन, भगवान बागुल, भरत पोफळे, प्रकाश वडगे, सुरेश कोतकर, हरिप्रसाद गुप्ता, संजय पांडे, रवींद्र मोरे, रमेश उचित, रामनिवास सोनी, गोरख सोनवणे, राजेश पंचारिया, उमा पंचारिया, कल्पना पाटील, योगिता बाविस्कर यांच्यासह रसिक वाचक सहभागी झाले होते.